अंगणवाड्या भरतात उघड्यावर !

By admin | Published: March 17, 2015 12:56 AM2015-03-17T00:56:14+5:302015-03-17T00:56:14+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील २८ अंगणवाड्या इमारतीविना.

Anganwadi filling open! | अंगणवाड्या भरतात उघड्यावर !

अंगणवाड्या भरतात उघड्यावर !

Next

बुलडाणा : विविध योजनांसाठी शासनस्तरावर कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होतो; मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निधीचा योग्य विनियोग होत नसल्यामुळे शासनाच्या योजनांपासून नागरिकांना वंचित राहावे लगते.
बुलडाणा तालुक्यातील ९१ अंगणवाड्यांच्या इमारत बांधकामासाठी निधी मंजूर असताना २८ अंगणवाड्यांना अद्यापही स्वतंत्र इमारती बांधल्या नाहीत. त्यामुळे या अंगवाड्यातील बालकांना कोठे शाळा खोल्यामध्ये, तर कोठे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये धडे घ्यावे लागत आहेत. जवळपास १५ अंगणवाड्यांच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर छतच नाही. या अंगणवाड्या चक्क उघड्यावर भरतात. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत बुलडाणा तालुक्यात २५0 अंगणवाडी केंद्र मंजूर आहेत, तर १२ मिनी अंगणवाडी केंद्र आहेत. यातील ९१ अंगणवाडी केंद्रांच्या इमारत बांधकामाल मंजुरात मिळाली आहे; मात्र चार वर्षांत केवळ ४५ अंगणवाडी केंद्रांचे बांधकाम पूर्ण झाले असून, अद्याप २८ अंगणवाडी केंद्रांचे काम रखडले आहे. केवळ १८ केंद्रांचे इमारत बांधकाम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे इमारत नसलेल्या अंगणवाडी केंद्रातील शेकडो विद्यार्थी कोठे ग्रमापंचायत कार्यालयात, तर कोठे समाज मंदिरात भरविल्या जातात. शाळा, समाजमंदिर व उघड्यावर भरणार्‍या अंगणावड्यांच्या बालकांना मग कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. इमारत बांधकामासाठी स्वतंत्र निधी असताना पं. स.च्या हलगर्जीपणामुळे अंगणवाडी केंद्राच्या इमारती रखडल्या आहेत.

Web Title: Anganwadi filling open!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.