अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोबाईल केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:21 AM2021-09-23T04:21:39+5:302021-09-23T04:21:39+5:30
पातूर : शासनाने ऑनलाईन कामकाजासाठी अंगणवाडीसेविकांना दिलेले मोबाईल कुचकामी ठरले असून, या मोबाईलमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने त्याचा आर्थिक ...
पातूर : शासनाने ऑनलाईन कामकाजासाठी अंगणवाडीसेविकांना दिलेले मोबाईल कुचकामी ठरले असून, या मोबाईलमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने त्याचा आर्थिक भुर्दंड अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सोसावा लागत आहे. त्यामुळे त्रस्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पातूर विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत मोबाईल परत केले.
आयटक संलग्न अंगणवाडी कर्मचारी युनियनचे राज्य उपाध्यक्ष कॉ. एस. एन. सोनोने, राज्य नेते कॉ. रमेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तर कॉ. सुनीता पाटील, नयन गायकवाड, दुर्गा देशमुख, आशा मदने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. त्यांच्यावर कारवाई करण्याचे परिपत्रक शासनाने काढल्याने या परिपत्रकाची होळी करण्यात आली. पातूर येथील आंदोलनात सुनीता पाटील, नयन गायकवाड, दुर्गा देशमुख, आशा मदने, प्रल्हाद मदने, सुनीता घोरे, शेषराव क्षीरसागर, रंजना राठोड, इंदू राठोड, रेखा गाडवे, अलका शिरसाट, पद्मा दांदळे, मिनाज खान, मैना खुळे, प्रतीभा वाडेकर आदी सहभागी झाले होते.
---------------
ह्या आहेत मागण्या
शासनाने जुना मोबाईल परत घेऊन नवीन चांगल्या दर्जाचे मोबाईल द्यावे, बिघाड झाल्यास दुरुस्ती करण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, नवीन पोषण टॅकर ॲप सदोष आहे ते मातृभाषा मराठीत करावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.