अंगणवाडी सेविका ‘नाॅट रिचेबल’; ऑफलाइन अहवालाचा वाढला ताण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:24 AM2021-09-15T04:24:19+5:302021-09-15T04:24:19+5:30

अकोला : विविध तक्रारींमुळे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांकडून मोबाइल परत करण्यात येत असून, १३ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात तीन तालुक्यांतील ६०७ अंगणवाडी ...

Anganwadi worker ‘not reachable’; Increased stress of offline reporting! | अंगणवाडी सेविका ‘नाॅट रिचेबल’; ऑफलाइन अहवालाचा वाढला ताण!

अंगणवाडी सेविका ‘नाॅट रिचेबल’; ऑफलाइन अहवालाचा वाढला ताण!

Next

अकोला : विविध तक्रारींमुळे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांकडून मोबाइल परत करण्यात येत असून, १३ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात तीन तालुक्यांतील ६०७ अंगणवाडी सेविकांकडून बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांकडे परत करण्यात आले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या कामांचे ऑफलाइन अहवाल तयार करण्याचा अंगणवाडी सेविकांचा ताण वाढला आहे.

माबाइल वारंवार नादुरुस्त होणे, मोबाइलची बॅटरी गरम होणे, पोषण ट्रॅकर या नवीन ॲपमध्ये मराठी भाषा नसल्याने इंग्रजी भाषेतून अहवाल तयार करताना येणाऱ्या अडचणी अशा विविध तक्रारींमुळे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांकडून आपले मोबाइल परत करण्यात येत आहेत. त्यामध्ये १३ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील अकोला, बार्शिटाकळी व तेल्हारा या तीन तालुक्यांतील ६०७ अंगणवाडी सेविकांनी आपल्याकडील मोबाइल संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे परत केले. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना वेगवेगळ्या कामांच्या नोंदी आणि अहवाल ऑफलाइन पद्धतीने तयार करण्याचा ताण वाढला आहे.

जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्या

१३९०

अंगणवाडी सेविका

१३२२

माबाइल परत केलेल्या अंगणवाडी सेविका

६०७

......................................................

म्हणून केला मोबाइल परत

मोबाइल वारंवार नादुरुस्त होणे, बॅटरी गरम होणे, तसेच इंग्रजी भाषेत असलेल्या पोषण ट्रॅकर या नवीन ॲपमध्ये मराठी भाषेचा वापर करता येत नसल्याने दैनंदिन कामांचे अहवाल तयार करण्याचे काम करताना अडचणी येत असल्याने अंगणवाडी सेविकांकडून मोबाइल परत करण्यात आले.

...............................................

कामाचा व्याप

अंगणवाडी सेविकांना गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुलींची माहिती नोंदविणे. तसेच शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांच्या वजनाच्या नोंदी, पूरक पोषण आहार वाटप, आरोग्य सर्वेक्षण, गृहभेटी, लसीकरण अशी विविध प्रकारची कामे करावी लागत असून, या सर्व कामांचा अहवाल तयार करावा लागतो.

.................................

असून अडचण, नसून खोळंबा !

मोबाइल वारंवार नादुरुस्त आणि हँग होत होता, तसेच मोबाइलची बॅटरी गरम होणे आणि इंग्रजी भाषा असलेल्या पोषण ट्रॅकर या नवीन ॲपमध्ये मराठी भाषा नसल्याने कामांचे अहवाल तयार करताना खोळंबा निर्माण होत असल्याने मोबाइल परत केला.

-उषा सुनील गोपनारायण,

अंगणवाडी सेविका, भौरद

.................फोटो.......................

मोबाइल वारंवार बंद पडत होता, हँग होत होता, तसेच पोषण टॅकर नवीन ॲप इंग्रजी भाषेत असल्याने आणि मराठी भाषेत काम करणे आणि कामांचे अहवाल तयार करताना अडचणी येत असल्याने मोबाइल परत केला आहे.

-मंगला शिवशंकर मालोकार,

अंगणवाडी सेविका

.................फोटो.........................

Web Title: Anganwadi worker ‘not reachable’; Increased stress of offline reporting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.