ऐन कोरोनाशी लढ्यात अंगणवाडीसेविका भरतीवरही टाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 10:22 AM2020-05-13T10:22:12+5:302020-05-13T10:22:17+5:30

अंगणवाडीसेविका, मदतनीस भरतीलाही बंदी घातल्याने महिला व बालकल्याण, आरोग्य विभाग जेरीस आला आहे.

 Anganwadi worker recruitment stopped | ऐन कोरोनाशी लढ्यात अंगणवाडीसेविका भरतीवरही टाच!

ऐन कोरोनाशी लढ्यात अंगणवाडीसेविका भरतीवरही टाच!

Next

अकोला : कोरोना विषाणूशी लढा देताना महिला, बालक, किशोरी यांच्यासह सामाजिक आरोग्याबाबत महत्त्वाची भूमिका असणाºया अंगणवाडीसेविका, मदतनीस भरतीलाही बंदी घातल्याने महिला व बालकल्याण, आरोग्य विभाग जेरीस आला आहे. रिक्त पदांमुळे कामाचा ताण वाढला असून, किमान या पदांची भरती शासनाने करावी, असा प्रस्ताव अनेक जिल्हा परिषदांकडून सादर केला जात आहे. त्यावर शासन आता कोणती भूमिका घेते, यावरच ही भरती प्रक्रिया अवलंबून आहे.
ग्रामीण भागातील महिला व बालकांच्या विकासाच्या विविध उपक्रमांची परिणामकारक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनिसांची राज्यातील अनेक जिल्हा परिषदा, नागरी प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. त्यामुळे या विभागाकडे असलेल्या विविध योजना, उपक्रमांची अंमलबजावणी करताना अडचणी येत आहेत. त्याशिवाय गरोदर, स्तनदा माता, शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहार, किशोरी योजना, कुपोषण रोखण्याचे उपक्रमही प्रभावित होत आहेत. ती रिक्त पदे भरण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी शासनानेही पदे तातडीने भरण्याचा आदेश दिला; मात्र त्यानंतर कोरोना विषाणूच्या संकटामुळे राज्य आर्थिक संकटात आहे. त्यामुळे कोणत्याही विभागातील कोणत्याही रिक्त पदांची भरती पुढील आदेशापर्यंत करू नये, असाही आदेश शासनाने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच दिला. त्यामुळे आता आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभागात अत्यावश्यक सेवेतील कामे करणाºया सेविकांची ही पदे कशी भरावी, अशी समस्या आता जिल्हा परिषदा, महापालिका, नगर परिषदांसमोर आहे. ही पदे न भरल्यास कोरोना प्रतिबंधाच्या विविध उपाययोजना प्रभावित होत आहेत. त्यामुळे ती पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव अनेक जिल्हा परिषदा, महापालिकांकडून शासनाकडे सादर केला जात आहे.

 रिक्त पदांचे अहवाल तयार
विशेष म्हणजे, शासनाच्या आधीच्या निर्देशानुसार अंगणवाडी, मदतनिसांच्या रिक्त पदांचे ग्रामीण, नागरी प्रकल्पांनी तयार केले. त्यानंतर भरती थांबवण्याचा आदेश शासनाने दिला.
अंगणवाडीसेविकांची सेवा या काळात अत्यावश्यक म्हणून समजली जाते. त्यामुळे त्यांची पदभरती करणे आवश्यक असल्याचे अनेक पदाधिकारी-अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अकोला जिल्ह्यात अंगणवाडीसेविका, मदतनिसांची २१५ पदे रिक्त आहेत. आता ती भरतीच थांबली आहे. भरती प्रक्रिया राबवताना अंगणवाडी सेविकांची पदे मदतनिसांना पदोन्नतीने थेट भरली जातील. त्यानंतर शिल्लक राहिलेली सेविकांची पदे व मदतनिसांच्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाते. आता राज्यभरात ती संपूर्ण प्रक्रिया थांबली आहे.

 प्रकल्पनिहाय सेविका, मदतनिसांची रिक्त पदे

प्रकल्प सेविका मदतनीस

अकोला ग्रामीण-१ ०४ १७

अकोला ग्रामीण-२ ०६ १४

बार्शीटाकळी ०५ १२

अकोट १८ २२

तेल्हारा १३ २५

बाळापूर ११ १६

मूर्तिजापूर १० १८

पातूर १३ ११

 

Web Title:  Anganwadi worker recruitment stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.