अमेरिकेतील शिष्यवृत्तीतून अनिकेत पटवर्धनला पीएच.डी.!
By admin | Published: March 12, 2016 02:35 AM2016-03-12T02:35:02+5:302016-03-12T02:35:02+5:30
हॉवर्ड विद्यापीठातून पीएच.डी. मिळविली.
अकोला: आरोग्य कॉलनी येथील रहिवासी अनिकेत अशोक पटवर्धनने अमेरिकेतील शिष्यवृत्ती मिळवून, त्याच्या बळावर हॉवर्ड विद्यापीठातून पीएच.डी. मिळविली आहे. अनिकेतच्या पीएच.डी.चा विषय ह्यइलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस, जे मालकाच्या आट्ठोवर घरातील उपकरणे सुरू करेलह्ण हा होता. त्याचे संशोधन मंजूर करून हॉवर्ड विद्यापीठाने त्याला नुकतीच पीएच.डी. प्रदान केली. प्राथमिक व शालेय शिक्षण अकोल्यात घेतलेल्या अनिकेतने मुंबई येथील अथर्व अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. यानंतर अमेरिकी शासनाकडून दिलेली जाणारी शिष्यवृत्ती मिळवून न्यूयॉर्क विद्यापीठातून तो एमएस झाला. अमेरिकेतील वास्तव्यात त्याने फावल्या वेळेत अर्थार्जन करून आपला उदरनिर्वाह केला. त्याच्या संगणकीय शोधामुळे व्यक्तीच्या आवाजानेच घरातील उपकरणे सुरू होऊ शकतील. त्याच्या संशोधनाबद्दल त्याचे हावर्ड विद्यापीठाने कौतुक करून त्याला पीएच.डी. प्रदान केली.