स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘अनिल’चा असाही पुढाकार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 06:20 PM2019-08-31T18:20:54+5:302019-08-31T18:21:07+5:30
अनिलने सुरु केलेला हा उपक्रम मोफत असल्याने विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्पर्धा परिक्षा देणाºया विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळावे, त्यांना परिक्षेत मदत व्हावी, त्यांच्या प्रश्नांचे निरासरण व्हावे याकरिता ‘अनिल’ने एक नविन उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाव्दारे विद्यार्थ्यांमधील स्पर्धा परिक्षांची भीती दूर करण्यापासून तर त्यांचे मनोबल वाढविण्यावर भर त्यांच्या व्याख्यानामधून दिल्या जात आहे. त्यांच्या प्रेरणादायी व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांच्या मनात असलेली स्पर्धा परिक्षेची भीती दूर होवून आत्मविश्वास वाढत असल्याचे खुद्द विद्यार्थी सांगताहेत. अनिलने सुरु केलेला हा उपक्रम मोफत असल्याने विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. नुकताच घे भरारी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रामधील कार्यक्रमात तब्बल २५० विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली होती.
वाशिम येथील रहिवासी तथा स्टेट बँकेत कार्यरत असलेले अनिल राहुडकर हे जरी नोकरी करीत असले तरी ते युवकांना नवनविन उद्योगाबाबत माहिती देवून त्यांना सहकार्य करुन रोजगारास लावले. स्वत: स्पर्धा परिक्षेमधून आल्याने गोरगरिब विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा याकरिता त्यांनी नविन प्रेरणादायी व्याख्यान मालिका सुरु केली आहे. या उपक्रमाव्दारे ते स्पर्धा परिक्षेसाठी तयार करणाºया विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. त्यामध्ये ते विद्यार्थ्यांना स्वत:चे ध्येय हे नुसता स्वत:च्या प्रगतीसाठी न ठरवता आपल्या सभोवताली असणाºया समस्या सोबत ते ध्येय जोडलेले असले पाहिजे . त्याचप्रमाणे हल्ली विद्यार्थी अभ्यास करण्याच्या वयामध्ये दुसरीकडेच भरकटत जातात . केवळ एका व्यक्तिची मदत, एकाच व्यक्तिवर प्रेम न करता सर्वांसोबत विषय शेअर करा. संभाषणामधून मार्ग सुटतात. योग्य दिशा मिळते यावर मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी अनिल राहुडकर यांना अनेक प्रश्न विचारुन त्याचे निरासरण केले. स्पर्धा परिक्षेची तयारी करतांना घ्यावयाची काळजी, जास्तीत जास्त एकमेकांशी चर्चा याबाबत मार्गदर्शन केले. केवळ पुस्तके वाचून ‘पुस्तकी कीडा’ बनण्यापेक्षा सामूहिक वाचन, चर्चा करुन मिळालेले ज्ञान हे चिरकाल राहत असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांनी यावर भर देणे गरजेचे आहे. यामुळे काय फायदा होतो याबाबत सविस्तर माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली व आपल्या व्याख्यानातून देत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांमधील स्पर्धा परिक्षेची भीती दूर करण्यासाठी विविध उदाहरणे, दाखले दिले. यावेळी गोपाल वांडे सह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.