जनावरांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:18 AM2021-08-01T04:18:31+5:302021-08-01T04:18:31+5:30
ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांची लागली वाट अकोला : वाहतूक करणाऱ्या अवजड आणि ओव्हरलोड वाहनांमुळे राज्यमार्गांची दुरवस्था झाली आहे. अनेक तालुक्यांमधील ...
ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांची लागली वाट
अकोला : वाहतूक करणाऱ्या अवजड आणि ओव्हरलोड वाहनांमुळे राज्यमार्गांची दुरवस्था झाली आहे. अनेक तालुक्यांमधील रेती घाटांलगतच्या गावातील रस्त्यांची अवजड वाहतुकीमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीचा नाहक भुर्दंड बसत आहे.
महा ई-सेवा केंद्रांची संख्या अत्यल्प
अकोला : महा ई-सेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे. शाळा सुरू झाल्याने विविध दाखल्यांची गरज भासत आहे. त्यामुळे महा ई-सेवा केंद्रांची संख्या वाढवणे गरजेचे आहे.
९८ टक्के क्षेत्रात तूर
अकोला : जिल्ह्यात आतापर्यंत ९७ टक्के क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. यामध्ये ९८ टक्के क्षेत्रात तुरीची पेरणी झाली आहे. कृषी विभागाकडून ५३ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणीचे नियोजन केले होते.
पेन्शन सुनावणी अंतिम टप्प्यात!
अकोला : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचारी पेन्शन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सुनावणीच्या अंतिम टप्प्यात आहे. महावितरणच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आता सोमवार, २ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. याबाबत महावितरणचे सेवानिवृत्त कर्मचारी कल्याण संघ व कर्मचारी संघ, नागपूर या संघटनांतर्फे अशोक पाराशर, अशोक जैन, अनिल साठे आणि अरुण अग्रवाल यांनी सांगितले आहे.