मोठ्या उमरीत अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवेंचे फलक फाडले!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 06:56 PM2018-02-26T18:56:40+5:302018-02-26T18:56:40+5:30

अकोला - शहरातील मोठी उमरी परिसरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व आद्यक्रांतिवीर लहुजी साळवे या महापुरूषांचे संयुक्त तैलचित्र फाडल्याची घटना सोमवारी पहाटे उजेडात आली.

Annabhau Sathe, lahuji Salve's banner vandilised at Akola | मोठ्या उमरीत अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवेंचे फलक फाडले!  

मोठ्या उमरीत अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवेंचे फलक फाडले!  

googlenewsNext
ठळक मुद्देमोठ्या उमरीत साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व आद्यक्रांतिवीर लहुजी साळवे यांचे संयुक्त तैलचित्र लावण्यात आले आहे.सदर तैलचित्र काही समाजकंटकांनी फाडून समाजाच्या भावना दुखावल्या. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांची भेट घेऊन सदर घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्याच्या सूचना दिल्या.



अकोला - शहरातील मोठी उमरी परिसरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व आद्यक्रांतिवीर लहुजी साळवे या महापुरूषांचे संयुक्त तैलचित्र फाडल्याची घटना सोमवारी पहाटे उजेडात आली. याप्रकारामुळे अवमान झाल्याने या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील मातंग समाजाने आक्रमक पवित्रा घेत आरोपीच्या अटकेची मागणी करीत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. या प्रकारामुळे मोठ्या उमरीत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
मोठ्या उमरीत साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व आद्यक्रांतिवीर लहुजी साळवे यांचे संयुक्त तैलचित्र लावण्यात आले आहे. सदर तैलचित्र काही समाजकंटकांनी फाडून समाजाच्या भावना दुखावल्या. त्यामुळे समाजातील ज्येष्ठ नेते मधुकरराव कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर समाज बांधवांच्या भावना जाणून घेत त्यांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांची भेट घेऊन सदर घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर राष्ट्रीय लहुशक्ती आणि इतर सामाजिक संघटनांनी एकत्र येत सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात सदर घटनेची तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मातंग समाज बांधवांच्या भावना दुखवल्या गेल्यामुळे पोलिसांनी त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी दोषींना अटक केली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवा लहु शक्तीतर्फे परिमल कांबळे, मनपा अकोला नगरसेवक पराग कांबळे यांनी दिला. यावेळी गजानन दांडगे, जगदीश भोंगळ, विनोद खवेकर, प्रकाश दांडगे, गणेश नृपनारायण, गजानन गवई, बाळासाहेब तायडे, गजानन तायडे, नारायण मानवतकर, राहुल तायडे, दिनेश खंडारे, सोनू खडसे, कृष्णा तायडे, कृष्णा साठे, यशोदा गायकवाड व बहुसंख्येने कार्यकर्ते, महिला व समाजबांधव रस्त्यावर उतरले होते.

Web Title: Annabhau Sathe, lahuji Salve's banner vandilised at Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.