अकोला जिल्ह्यात कोरोना महासाथीची वर्षपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 10:24 AM2021-04-07T10:24:18+5:302021-04-07T10:28:18+5:30

अकोला : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने जिल्ह्यात ७ एप्रिल २०२० रोजी शिरकाव केला होता. कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने अकोलेकरांच्या ...

Anniversary of Corona Mahasathi in Akola district | अकोला जिल्ह्यात कोरोना महासाथीची वर्षपूर्ती

अकोला जिल्ह्यात कोरोना महासाथीची वर्षपूर्ती

Next
ठळक मुद्दे७ एप्रिलला आढळला होता पहिला रुग्णआतापर्यंत २९,२९५ कोरोनाग्रस्तांची नोंद

अकोला : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने जिल्ह्यात ७ एप्रिल २०२० रोजी शिरकाव केला होता. कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने अकोलेकरांच्या मनात धडकी भरली होती. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊन आज एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असून, पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २९ हजार २६७ वर पोहोचला आहे. सध्याची स्थिती चिंताजनक असली, तरी अकोलेकरांमध्ये कोरोनाविषयी पूर्वीसारखी धास्ती दिसून येत नाही. गतवर्षी शहरातील बैदपुरा परिसरातील एक ५९ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. अकोल्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. कोरोनाविषयी मनात भीती असल्याने लोक मास्क, हॅन्ड सॅनिटायझरचा वापर करू लागले होते. जून, जुलैनंतर सप्टेंबर महिन्यात कोरोनाने धुमाकुळ घातला होता. सप्टेंबर महिन्यात ८४ जणांचा मृत्यू, तर तीन हजारांपेक्षा जास्त लोक कोविड पॉझिटिव्ह आले हाेते. त्यामुळे लोकांमध्ये भीतीही वाढली होती, मात्र सप्टेंबरनंतर जिल्ह्यातील कोरोनाचा कहर कमी होऊ लागला होता. दिवाळीनंतर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात होता. फेब्रुवारी २०२१ पासून जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली, ती अजूनही सुरूच आहे. गत वर्षभरात आतापर्यंत सर्वाधिक कोविड रुग्ण आणि मृत्यूची नोंद मार्च महिन्यात करण्यात आली. हा प्रकार धक्कादायक असला, तरी नागरिकांची बेफिकीरी जीवघेणी ठरत आहे.

असे वाढले रुग्ण (२०-२१)

महिना - रुग्ण - मृत्यू

 

एप्रिल - २८ - ०३

मे - ५५३ - २९

 

जून - ९६९ - ४७

जुलै - १०८७ - ३४

 

ऑगस्ट - १४०० - ४७

सप्टेंबर - ३४६८ - ८४

ऑक्टोबर - ८९३ - ४५

नोव्हेंबर - १०३३ - १२

 

डिसेंबर - १०५८ - २९

जानेवारी - ११३५ - १४

फेब्रुवारी - ४५२७ - ३१

मार्च - ११५५५ - ८६ महिना - रुग्ण - मृत्यू

एप्रिल - २८ - ०३

मे - ५५३ - २९

जून - ९६९ - ४७

जुलै - १०८७ - ३४

ऑगस्ट - १४०० - ४७

सप्टेंबर - ३४६८ - ८४

ऑक्टोबर - ८९३ - ४५

नोव्हेंबर - १०३३ - १२

डिसेंबर - १०५८ - २९

जानेवारी - ११३५ - १४

फेब्रुवारी - ४५२७ - ३१

मार्च - ११५५५ - ८६

एप्रिल - १५६७ - २३ (६ एप्रिलपर्यंत)

 

पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सहकुटुंब जगतोय आनंदी जीवन

जिल्ह्यातील पहिला कोविड पॉझिटिव्ह रुग्ण हा शहरातील बैदपुरा परिसरातील रहिवासी असून, त्यांना ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा संदिग्ध रुग्ण म्हणून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ७ एप्रिलला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

ते व्यवसायानिमित्त दिल्ली येथे गेले होते. तेथून परत आल्यावर त्यांच्या प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाला होता. त्यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबातील इतरही सदस्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

सद्य:स्थितीत ते कोरोनापासून मुक्त असून ठणठणीत आहेत. ते त्यांच्या कुटुंबीयांसह आनंदी जीवन व्यतीत करत आहेत.

 

पुरेसा औषध साठा

जिल्ह्यात डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर, तर डेडिकेडेट कोविड हॉस्पिटल कार्यरत आहेत. या ठिकाणी कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार सुरू आहे. या सर्व खासगी, शासकीय रुग्णालयात औषधसाठा पुरेसा असला, तरी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची कमी वारंवार जाणवत आहे.

कोविड ग्रस्तांकरीता कोविड सेंटर पुरेसे

जिल्ह्यात एकूण २४ कोविड केअर सेंटर आणि कोविड डेडिकेडेट हॉस्पिटल कार्यरत असून, या ठिकाणी एकूण १६०२ खाटा उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील बहुतांश कोरोना बाधित रुग्ण गृहविलगीकरणात असल्याने कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयातील खाटा पुरेशा ठरत आहेत, मात्र मध्यंतरी काही ऑक्सिजनचा तुटवडा आणि व्हेंटिलेटरची कमी भासली होती. अशा परिस्थितीतही विविध अडचणींवर मात करून आरोग्य विभाग कोरोनाशी दोन हात करत आहे. पुढील दोन महिने आणखी सतर्कता बाळगण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले आहे.

Web Title: Anniversary of Corona Mahasathi in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.