‘डीपीसी’ निवडणूक कार्यक्रम जाहीर करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:15 AM2020-12-25T04:15:52+5:302020-12-25T04:15:52+5:30
अकोला: जिल्हा नियोजन समितीमध्ये (डीपीसी) जिल्हा परिषद सदस्यांची निवड करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती निवडणुकीचा कार्यक्रम तातडीने जाहीर करण्याची मागणी ...
अकोला: जिल्हा नियोजन समितीमध्ये (डीपीसी) जिल्हा परिषद सदस्यांची निवड करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती निवडणुकीचा कार्यक्रम तातडीने जाहीर करण्याची मागणी जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांनी बुधवार, २३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे केली.
जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्य म्हणून जिल्हा परिषद सदस्यांची निवड करण्यात येते; मात्र जिल्हा परिषदेची निवडणूक होऊन ११ महिन्यांचा कालावधी होऊनही समितीमध्ये जिल्हा परिषद सदस्यांची निवड करण्यासाठी निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीमध्ये जिल्हा परिषद सदस्यांची निवड करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम तातडीने जाहीर करण्याची मागणी जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. यावेळी जिल्हा परिषदेतील सत्तापक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ, सदस्य डाॅ. प्रशांत अढाऊ, सुनील फाटकर, अविनाश खंडारे आदी उपस्थित होते.
...अन्यथा जिल्हाधिकारी
कार्यालयात ठिय्या आंदोलन!
जिल्हा नियोजन समितीमध्ये जिल्हा परिषद सदस्यांची निवड करण्यासाठी सात दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात देण्यात आला.
..................फोटो................