विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या वार्षिक निरीक्षणास सुरुवात
By admin | Published: January 5, 2017 02:41 AM2017-01-05T02:41:40+5:302017-01-05T02:41:40+5:30
दोन दिवस मुक्काम; गुन्हय़ांचा घेतला आढावा
अकोला, दि. ४- अमरावती परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांच्या वार्षिक निरीक्षणास ४ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. बुधवारी डॉ. जाधव यांनी बाळापूर विभागातील बाळापूर, उरळ पोलीस ठाण्यासह शहर विभागातील पोलीस ठाण्यांमधील कामकाजाचे, गुन्हय़ांचे व पोलीस मुख्यालयात आयोजित पोलीस परेडचे निरीक्षण केले. वार्षिक निरीक्षणासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जाधव आणखी दोन दिवस शहरात थांबणार आहेत. दरवर्षी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून जिल्हय़ातील पोलीस ठाण्यांचे निरीक्षण व कामकाजासंबंधीचा आढावा घेण्यात येतो. यंदासुद्धा विशेष महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांनी विभागनिहाय पोलीस ठाण्यांचे निरीक्षण सुरू केले आहे. बुधवारी डॉ. जाधव व त्यांच्या चमूने बाळापूर, उरळ पोलीस ठाण्यांसह शहरातील पोलीस ठाण्यांमधील कामकाजाचा आढावा घेतला, तसेच दाखल झालेले गुन्हे आणि निकाली काढण्यात आलेल्या गुन्हय़ांचा गोषवारासुद्धा त्यांनी तपासला. यासोबतच पोलीस ठाण्यांमधील शस्त्रागार, पोलीस कर्मचार्यांचे कीट परीक्षण आणि परेडचेसुद्धा निरीक्षण केले. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी निरीक्षण केल्यानंतर ठाणेदारांना आवश्यक त्या सूचनासुद्धा केल्या आणि कामकाजामध्ये गती निर्माण करून अधिकाअधिक गुन्हे निकाली काढण्यावर भर द्यावा, असे स्पष्ट केले. गत दोन वर्षांमध्ये जिल्हय़ातील गुन्हेगारी बर्याच प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. त्याबद्दल त्यांनी पोलीस अधीक्षकांसह ठाणेदारांचे कौतुक केले आणि जिल्हय़ातील गुन्हेगारी कशी कमी होईल, या दृष्टिकोनातून सर्व ठाणेदारांनी समन्वय राखून काम करावे, असे मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अ ितरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब नाईक, मूर्तिजापूरच्या एसडीपीओ कल्पना भराडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.