अकोला जिल्ह्यात आणखी १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 12:46 PM2021-01-11T12:46:11+5:302021-01-11T12:46:27+5:30
Coronavirus News आणखी १२ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या १०,९३५ वर पोहोचली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, सोमवार, ११ जानेवारी रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी १२ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या १०,९३५ वर पोहोचली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी त आरटीपीसीआर चाचण्यांचे ७३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ६१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये रामदास पेठ, तापडीया नगर व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित रणपिसे नगर, गीता नगर, गाडगे नगर, डाबकी रोड, अकोट व दुबेवाडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
६३८ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,९३५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,९७३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६३८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.