आणखी १२ जणांचा मृत्यू, ७६२ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:18 AM2021-05-10T04:18:39+5:302021-05-10T04:18:39+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २,२९४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

Another 12 died, 762 positive | आणखी १२ जणांचा मृत्यू, ७६२ पॉझिटिव्ह

आणखी १२ जणांचा मृत्यू, ७६२ पॉझिटिव्ह

Next

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २,२९४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,७४४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवारी दिवसभरात १२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये पातूर येथील ७० वर्षीय महिला, बाळापूर नाका येथील २४ वर्षीय महिला, जीएमसी क्वार्टर येथील ६९ वर्षीय महिला, अकोट येथील ६० वर्षीय महिला, डोंगरगाव येथील ६९ वर्षीय पुरुष, बाळापूर येथील ७२ वर्षीय पुरुष, कौलखेड येथील ५८ वर्षीय महिला, खदान येथील ५९ वर्षीय पुरुष, अकोट येथील ४५ वर्षीय महिला, कावसा ता.अकोट येथील ६२ वर्षीय पुरुष, खामखेड, ता.पातूर येथील ६१ वर्षीय महिला आणि मलकापूर येथील ८२ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

तालुकानिहाय रुग्णसंख्या

मूर्तिजापूर - ६१

अकोट - १०२

बाळापूर - २७

तेल्हारा -१३

बार्शीटाकळी-३८

पातूर- ३७

अकोला - २७२(अकोला ग्रामीण- ५२, अकोला मनपा क्षेत्र-२२०)

५३९ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३१, हार्मोनी हॉस्पिटल येथील एक, क्रिस्टल हॉस्पिटल येथील दोन, उशाई हॉस्पिटल येथील एक, पाटील हॉस्पिटल येथील दोन, आयकॉन हॉस्पिटल येथील तीन, ओझोन हॉस्पिटल येथील दोन, युनिक हॉस्पिटल येथील तीन, अवघाते हॉस्पिटल येथील एक, बबन हॉस्पिटल येथील चार, ठाकरे हॉस्पिटल येथील दोन, अथर्व हॉस्पिटल येथील एक, आधार हॉस्पिटल येथील एक, देवसार हॉस्पिटल येथील एक, कोविड केअर सेंटर अकोट येथील सहा, समाज कल्याण वसतिगृह येथील आठ, केअर हॉस्पिटल येथील दोन, जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथील पाच, सहारा हॉस्पिटल येथील तीन, काळे हॉस्पिटल येथील तीन, अकोला ॲक्सिडेंट येथील एक, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी तीन, बिहाडे हॉस्पिटल येथील तीन, तर होम आयसोलेशनमधील ४५० अशा एकूण ५३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

६,५६४ उपचाराधीन रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४५,८०० जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ३८,४३७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ७९९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६,५६४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another 12 died, 762 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.