अकोला जिल्ह्यात आणखी १२ पॉझिटिव्ह, २२ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 06:05 PM2021-02-08T18:05:13+5:302021-02-08T18:05:34+5:30
Coronavirus News १२ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ११,८५४ वर पोहोचली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची साखळी खंडित होण्याची कोणतीही चिन्हे नसून सोमवार, ८ फेब्रुवारी रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १२ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ११,८५४ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ८२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७० अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये दुर्गा चौक, गोरक्षण रोड, कंवर नगर, न्यू तापडीया नगर, अडगाव हिवरखेड ता. तेल्हारा, डाबकी रोड, जीएमसी क्वॉर्टर, रणपिसे नगर, शिवणी, जवाहर नगर, जीएमसी व शिवाजी पार्क येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
२२ जणांना डिस्चार्ज
ओझोन हॉस्पीटल येथून एक, बिहाडे हॉस्पीटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले १८ अशा एकूण २२ जणांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला.
८०२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,८५४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १०,७१४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३३८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ८०२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.