अकोल्यात कोरोनाचे आणखी १३ रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 12:45 PM2020-08-22T12:45:10+5:302020-08-22T12:45:44+5:30
२२ आॅगस्ट रोजी आणखी १३ नवॅ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३४११ वर गेली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शनिवार, २२ आॅगस्ट रोजी आणखी १३ नवॅ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३४११ वर गेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शनिवारी आरटीपीसीआर’ चाचणीचे ३४४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १३ जण पॉझिटिव्ह असून, तब्बल ३३१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या १३ जणांमध्ये चार महिला व नऊ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये अकोट तालुक्याती सावरा व मुर्तीजापूर येथील प्रत्येकी पाच जणांसह, खांबोरा येथील दोन, तर डाबकी रोड येथील एकाचा समावेश आहे.
३५४ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३४११ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २९१४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १४३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३५४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.