आणखी १३ जणांचा मृत्यू, ४०८ नव्याने पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:14 AM2021-04-29T04:14:39+5:302021-04-29T04:14:39+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २००७ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी २६९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

Another 13 died, 408 newly positive | आणखी १३ जणांचा मृत्यू, ४०८ नव्याने पॉझिटिव्ह

आणखी १३ जणांचा मृत्यू, ४०८ नव्याने पॉझिटिव्ह

googlenewsNext

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २००७ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी २६९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १७३८ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील दोन, अकोट तालुक्यातील १०, बाळापूर तालुक्यातील २५, तेल्हारा तालुक्यातील पाच, बार्शी टाकळी तालुक्यातील ६३, पातूर तालुक्यातील २८ आणि अकोला - १३६ (अकोला ग्रामीण- २६, अकोला मनपा क्षेत्र- ११०) रुग्णांचा समावेश आहे.

येथील रुग्णांचा झाला मृत्यू

तेल्हारा येथील ५५ वर्षीय महिला

जुने शहर येथील ६८ वर्षीय पुरुष, येळवन, ता. बार्शीटाकळी येथील २९ वर्षीय महिला, गौतम नगर येथील ८१ वर्षीय पुरुष, बेलुरा उमरा ता. अकोट येथील ६० वर्षीय पुरुष, चोहट्टा बाजार ता. अकोट येथील ५२ वर्षीय पुरुष, केशव नगर येथील ८२ वर्षीय पुरुष, एमआयडीसी नं. ४ शिवणी येथील ७० वर्षीय पुरुष, उमरी ता. तेल्हारा येथील ५० वर्षीय पुरुष, कोळंबी, ता. मूर्तिजापूर येथील ५८ वर्षीय पुरुष, शिवर येथील २९ वर्षीय पुरुष, अकोट येथील ६० वर्षीय पुरुष, शास्त्रीनगर येथील ७८ वर्षीय महिला.

७२८ कोरोनामुक्त

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४३, कोविड केअर सेंटर अकोट येथील १८, केअर हॉस्पिटल येथील एक, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथील ११, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील तीन, यकीन हॉस्पिटल येथील एक, अकोला ॲक्सिडेंट येथील पाच, देवसार हॉस्पिटल येथील तीन, आयकॉन हॉस्पिटल येथील सात, ओझोन हॉस्पिटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, सहारा हॉस्पिटल येथील एक, इंदिरा हॉस्पिटल येथील दोन, अर्थव हॉस्पिटल येथील दोन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील चार, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथील एक, समाज कल्याण मुलांचे वसतिगृह येथील दोन, तर होम आयसोलेशनमधील ६१५ अशा एकूण ७२८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

५,०२० उपचाराधीन रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३८,९५१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ३३,२६३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ६६८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५,०२० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another 13 died, 408 newly positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.