अकोला जिल्ह्यात आणखी १४८ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:10 PM2021-02-18T17:10:08+5:302021-02-18T17:10:18+5:30
Corona Virus News आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १२४, तर रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये २४ अशा एकूण १४८ रुग्णांची नोंद गुरुवारी झाली.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला असून, आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १२४, तर रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये २४ अशा एकूण १४८ रुग्णांची नोंद गुरुवारी झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १३,०२६ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवार १८फेब्रुवारी रोजी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४९० अहवाल प्राप्त झाले. यांपैकी १२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३६६ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट येथील २२, मुर्तिजापूर येथील १९, जठारपेठ येथील सात, कौलखेड व मोठी उमरी येथील पाच, राऊतवाडी व दीपक चौक येथील चार, जीएमसी क्वार्टर, आळ्शी प्लॉट, डाबकी रोड येथील प्रत्येकी तीन, मलकापूर, जीएमसी होस्टेल, गीतानगर, तापडिया नगर, पार्वतीनगर, खिरपुरी बु., बाळापूर रोड, बिर्ला कॉलनी येथील प्रत्येकी दोन, तर अमान खॉ प्लॉट, न्यू जैन टेम्पल, मासा, गायत्रीनगर, बंजारानगर, खडकी, रिधोरा, उमरी, फिरदौस कॉलनी, आरोग्य कॉलनी, गजानन पेठ, सीईओ ऑफिसजवळ, रविनगर, गोरक्षण रोड, लहरीया नगर, बाभुळगाव, हनुमान नगर, जस्तगाव, आरएमओ होस्टेल, रजपुतपुरा, गड्डम प्लॉट, काटेपूर्णा, सावंतवाडी, भागवतवाडी, लहान उमरी, अकोट स्टॅण्ड, कृषी नगर, खोलेश्वर, सातव चौक, नंदाणे मंगल कार्यालयाजवळ, लेडी हार्डींग क्वार्टर, मोरेश्वर कॉलनी, खेळकर नगर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
रॅपिड चाचण्यांमध्ये २४ पॉझिटिव्ह
बुधवार १७ फेब्रुवारी रोजी झालेल्या ११४ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये २४ जण पॉझिटिव्ह आढळून आले. आतपर्यंत झालेल्या एकूण ३३,३९३ चाचण्यांमध्ये २३०७ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
१,३४२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३,०२६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,३८३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३४६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत १,३४२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.