आणखी १५ जणांचा मृत्यू, ४९३ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:19 AM2021-05-20T04:19:49+5:302021-05-20T04:19:49+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,८१४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३०१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

Another 15 died, 493 positive | आणखी १५ जणांचा मृत्यू, ४९३ पॉझिटिव्ह

आणखी १५ जणांचा मृत्यू, ४९३ पॉझिटिव्ह

Next

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,८१४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३०१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,५१३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवारी १५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये रोहणा येथील ६५ वर्षीय महिला, बाळापूर येथील ७० वर्षीय पुरुष, गायत्रीनगर येथील ५० वर्षीय महिला, पंचशीलनगर येथील ६५ वर्षीय पुरुष, अकोट येथील ३३ वर्षीय महिला, कान्हेरी सरप येथील ४५ वर्षीय पुरुष, पातूर येथील ७७ वर्षीय पुरुष, जुने शहर येथील ४५ वर्षीय पुरुष, दहिहांडा येथील ५० वर्षीय पुरुष, कुंभारी येथील ६५ वर्षीय पुरुष, मोठी उमरी येथील ३७ वर्षीय महिला, फडकेनगर येथील ५५ वर्षीय महिला, रोहणा येथील ४३ वर्षीय पुरुष, बालाजीनगर येथील ४४ वर्षीय पुरुष व बंजारानगर येथील ६२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

तालुकानिहाय रुग्णसंख्या

मूर्तिजापूर- १०, अकोट- ५०, बाळापूर-३५, तेल्हारा-२३, बार्शी टाकळी-३१, पातूर-३४, अकोला- ११८ (अकोला ग्रामीण- ४४, अकोला मनपा क्षेत्र-७४)

५२७ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३०, मुलांचे वसतिगृह येथील तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथील तीन, पीडीकेव्ही येथील चार, आयुर्वेदिक महाविद्यालय येथील १०, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथील तीन, खासगी रुग्णालयांमधील ३९ आणि होम आयसोलेशनमधील ४३५ अशा एकूण ५२७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

६,५४६ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५१,६४९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ४४,१४५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ९५८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६,५४६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another 15 died, 493 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.