अकोला जिल्ह्यात आणखी १५४ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 03:53 PM2021-02-16T15:53:28+5:302021-02-16T15:53:35+5:30
CoronaVirus News आणखी १५४ पॉझिटिव्ह आढळून आल्याने, एकूण बाधितांची संख्या १२,६५९ वर पोहोचली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, मंगळवार, १६ फेब्रुवारी रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी १५४ पॉझिटिव्ह आढळून आल्याने, एकूण बाधितांची संख्या १२,६५९ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४८५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १५४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३३१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मुर्तिजापूर येथील २९, अकोट येथील १४, गीता नगर, तापडीया नगर येथील प्रत्येकी सहा, रवी नगर, डाबकी रोड, गोरक्षण रोड व तेल्हारा येथील प्रत्येकी पाच, जीएमसी व डोंगरगाव येथील प्रत्येकी चार, मोठी उमरी, लक्ष्मी नगर, जीएमसी हॉस्टेल व कौलखेड येथील प्रत्येकी तीन, अमानखाँ प्लॉट, जूने शहर, बाळापूर, पानीपत चौक, पिकेव्ही क्वॉर्टर, तोष्णीवाल लेआऊट, जठारपेठ, जवाहर नगर येथील प्रत्येकी दोन, तर बॉय हॉस्टेल, सिंधी कॅम्प, खदान, कॉग्रेस नगर, गोकूल कॉलनी, उमरी, घुसर, शिव नगर, मलकापूर, वनी रंभापूर, यात्रा चौक,दिनोडा, दाना बाजार, बाळापूर नाका, रमेश नगर, शंकर नगर, सिराज पार्क, गुरुकृष्णा कॉलनी, अडगाव ता.तेल्हारा, सिंधी कॅम्प, किर्ती नगर, राम नगर, हरीहर पेठ, आळसी प्लॉट, शिवनेर कॉलनी, दुर्गा चौक, गुलजारपुरा, टॉवर चौक, वृदावन नगर, टेलीफोन कॉलनी, बार्शीटाकळी, केशव नगर, हिंगणा रोड, किर्ती नगर, रामदासपेठ, मलकापूर, सातव चौक, राजकमल टॉकीज, मराठा नगर, केला प्लॉट, राहटे नगर, दत्त कॉलनी व रणपिसे नगर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
११२५ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १२,६५९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,१९० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३४४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,१२५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.