आणखी १५९ पॉझिटिव्ह, ९९ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:24 AM2021-02-17T04:24:17+5:302021-02-17T04:24:17+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४९२ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी १५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४९२ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी १५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३३३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर येथील २९, अकोट येथील १४, गीतानगर, तापडियानगर येथील प्रत्येकी सहा, रविनगर, डाबकी रोड, गोरक्षण रोड व तेल्हारा येथील प्रत्येकी पाच, जीएमसी व डोंगरगाव येथील प्रत्येकी चार, मोठी उमरी, लक्ष्मीनगर, जीएमसी हॉस्टेल व कौलखेड येथील प्रत्येकी तीन, अमानखाँ प्लॉट, जुने शहर, बाळापूर, पानिपत चौक, पिकेव्ही क्वार्टर, तोष्णीवाल लेआऊट, जठारपेठ, जवाहर नगर येथील प्रत्येकी दोन, तर बॉय हॉस्टेल, सिंधी कॅम्प, खदान, कॉग्रेस नगर, गोकुल कॉलनी, उमरी, घुसर, शिव नगर, मलकापूर, वनी रंभापूर, यात्रा चौक,दिनोडा, दाना बाजार, बाळापूर नाका, रमेशनगर, शंकरनगर, सिराज पार्क, गुरुकृष्णा कॉलनी, अडगाव ता.तेल्हारा, सिंधी कॅम्प, किर्ती नगर, राम नगर, हरीहर पेठ, आळसी प्लॉट, शिवनेर कॉलनी, दुर्गा चौक, गुलजारपुरा, टॉवर चौक, वृंदावननगर, टेलिफोन कॉलनी, बार्शीटाकळी, केशव नगर, हिंगणा रोड, किर्ती नगर, रामदासपेठ, मलकापूर, सातव चौक, राजकमल टॉकीज, मराठानगर, केला प्लॉट, राहटेनगर, दत्त कॉलनी व रणपिसेनगर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी जीएमसी येथील तीन तर गुलशन कॉलनी येथील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
९९ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ३२, आयकॉन हॉस्पिटल येथून पाच, बिहाडे हॉस्पीटल येथून सात, स्कायलार्क हॉटेल येथून तीन, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून एक, तर होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले ५१ अशा एकूण ९९ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.
१,०३१ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १२,६६४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,२८९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३४४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत १,०३१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.