आणखी १६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 12:17 PM2020-10-14T12:17:29+5:302020-10-14T12:17:40+5:30
CoronaVirus Akola १६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७८९० झाली आहे.
अकोला : गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला असून, १४ आॅक्टाबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७८९० झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ११६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये रामदासपेठ येथील तीन, अकोट व डाबकी रोड येथील प्रत्येकी दोन, कान्हेरी सरप, कृषी नगर, शिवनी, हिसपूर ता.मुर्तिजापूर, सागर कॉलनी, संतोष नगर, दहीहांडा ता. अकोट, फडके नगर व छोटी उमरी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
४०३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,८९० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,२२७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २६० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४०३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.