अकोला जिल्ह्यात आणखी १८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 12:36 PM2020-11-23T12:36:52+5:302020-11-23T12:36:57+5:30
Akola CoronaVirus News आणखी १८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९,०४७ झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून, सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी १८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९,०४७ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ७७९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७६१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्य तेल्हारा येथील तीन, पातूर व जीएमसी येथील प्रत्येकी दोन, अंधारसांवगी ता. पातूर, शिर्ला ता. पातूर, आळसी प्लॉट, स्कूल आॅफ स्कॉलर्स, पारस, शिवनी, उमरदरी ता. बार्शिटाकळी, लखमापूर ता. बार्शिटाकळी, डाबकी रोड, जीएमसी क्वॉटर व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
५२९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९,०४७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८२३० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५२९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.