आणखी २५९ कोरोना पॉझिटिव्ह, ४६ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 07:43 PM2021-02-18T19:43:34+5:302021-02-18T19:43:41+5:30

CoronaVirus आणखी २५९ पॉझिटिव्ह रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे एकूण बाधितांची संख्या १३,१३७ वर पोहोचली आहे.

Another 259 corona positive, 46 corona free | आणखी २५९ कोरोना पॉझिटिव्ह, ४६ कोरोनामुक्त

आणखी २५९ कोरोना पॉझिटिव्ह, ४६ कोरोनामुक्त

googlenewsNext

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला असून, गुरुवार १८ फेब्रुवारीच्या आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २३५, तर बुधवारी झालेल्या रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये २४ असे आणखी २५९ पॉझिटिव्ह रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे एकूण बाधितांची संख्या १३,१३७ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवार १८ फेब्रुवारी रोजी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ८१४ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी २३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ५७९ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये १२४ जणांमध्ये अकोट येथील २२, मुर्तिजापूर येथील १९, जठारपेठ येथील सात, कौलखेड व मोठी उमरी येथील पाच, राऊतवाडी व दीपक चौक येथील चार, जीएमसी क्वार्टर, आळ्शी प्लॉट, डाबकी रोड येथील प्रत्येकी तीन, मलकापूर, जीएमसी होस्टेल, गीतानगर, तापडिया नगर, पार्वतीनगर, खिरपुरी बु., बाळापूर रोड, बिर्ला कॉलनी येथील प्रत्येकी दोन, तर अमान खॉ प्लॉट, न्यू जैन टेम्पल, मासा, गायत्रीनगर, बंजारानगर, खडकी, रिधोरा, उमरी, फिरदौस कॉलनी, आरोग्य कॉलनी, गजानन पेठ, सीईओ ऑफिसजवळ, रविनगर, गोरक्षण रोड, लहरीया नगर, बाभुळगाव, हनुमान नगर, जस्तगाव, आरएमओ होस्टेल, रजपुतपुरा, गड्डम प्लॉट, काटेपूर्णा, सावंतवाडी, भागवतवाडी, लहान उमरी, अकोट स्टॅण्ड, कृषी नगर, खोलेश्वर, सातव चौक, नंदाणे मंगल कार्यालयाजवळ, लेडी हार्डींग क्वार्टर, मोरेश्वर कॉलनी, खेळकर नगर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या १०१ जणांमध्ये स्टेट बॅंकेतील १२ जण, बॅंक ऑफ बडोदा, कौलखेड, गोरक्षण रोड, जठारपेठ येथील प्रत्येकी सात जण, सिंधी कॅम्प व छोटी उमरी येथील प्रत्येकी सहा जण, डाबकी रोड येथील पाच जण, न्यु राधाकिसन प्लॉट, मोठी उमरी येथील प्रत्येकी चार जण, गीतानगर येथील तीन जण, जीएमसी, शास्त्री नगर, केशव नगर, जिल्हाधिकारी कार्यालय, जुने शहर, राऊतवाडी, सहकार नगर, गुढदी, द्वारका नगरी, पळसोबढे येथील प्रत्येकी दोन,त व्यंकटेश नगर, न्यु भागवत प्लॉट, तापडिया नगर, लेडी हार्डींग क्वार्टर, माधव नगर, रामनगर, जयहिंद चौक, गोकुळ कॉलनी, चिखलगाव, रुस्तमाबाद ता. बार्शीटाकळी, रणपिसेनगर, देवडी, गंगाधर प्लॉट, न्यु खेतान नगर, तुकाराम चौक, नवरंग सोसायटी, तारफैल, रामदास पेठ, गिरीनगर, सावदे प्लॉट, गोडबोले प्लॉट, त्रिवेदी अपार्टमेंट, अनिकत हनुमान आखाडा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

रॅपिड चाचण्यांमध्ये २४ पॉझिटिव्ह

बुधवार १७ फेब्रुवारी रोजी झालेल्या ११४ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये २४ जण पॉझिटिव्ह आढळून आले. आतपर्यंत झालेल्या एकूण ३३,३९३ चाचण्यांमध्ये २३०७ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

 

४६ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून तीन, आयकॉन हॉस्पीटल येथून तीन, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन, स्कायलार्क हॉटेल येथून आठ, सुर्यचंद्र हॉस्पिटल येथून चार, ओझोन हॉस्पिटल येथून एक तर होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले २४ अशा एकूण ४६ जणांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.

१,४०७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३,१३७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,३८४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३४६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत १,४०७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another 259 corona positive, 46 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.