अकोला जिल्ह्यात आणखी २६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 12:38 PM2020-11-28T12:38:13+5:302020-11-28T12:38:21+5:30
CoronaVirus News आणखी २६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ९३२४ वर गेली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शनिवार २८ नोव्हेंबर रोजी आणखी २६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ९३२४ वर गेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २२४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १९८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये विठ्ठल नगर, गोरक्षण रोड व सुधीर कॉलनी येथील प्रत्येकी तीन, खोलेश्वर व मोठी उमरी येथील प्रत्येकी दोन, शिवाजी नगर, सिंधी कॅम्प, राम नगर, शास्त्री नगर, निंबा ता. मूर्तिजापूर, अकोट, चोहट्टा बाजार, प्रोफेशन कॉलनी, आपातापा रोड, गुडधी, कैलास टेकडी, काळेगाव व जीएमसी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे
६७६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९,३२४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८३२९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २९१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६७६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.