अकोला जिल्ह्यात आणखी २७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 12:24 PM2020-11-20T12:24:07+5:302020-11-20T12:24:17+5:30
Akola CoronaVirus News आणखी २७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,९१४ झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून, शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी २७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,९१४ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ७१० अहवाल प्राप्त झाले. यापैकी २७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ६८३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये सुधीर कॉलनी, अकोट, मलकापूर, बालाजी नगर व बाळापूर येथील प्रत्येकी दोन, चांदुर खदान, मुर्तिजापूर, बाभूळगाव ता. पातूर, सहकार नगर, डाबकी रोड, सिंधी कॅम्प, नया अंदुरा ता. बाळापूर, बाळापूर, चोहट्टा बाजार, गीता नगर, शिवचरण पेठ, मिलींद विद्यालय, हरिहर पेठ, गोरक्षण रोड, मोहम्मद अली रोड, कान्हेरी सरप व खडकी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
४३९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,९१४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८१८८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४३९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.