अकोला जिल्ह्यात आणखी २८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 12:24 PM2021-01-07T12:24:32+5:302021-01-07T12:24:45+5:30
CoronaVirus News २८ पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे एकूण रुग्णसंख्या १०,७६३ वर पोहोचली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचे सत्र सुरुच असून, गुरुवार, ७ जानेवारी रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी २८ पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे एकूण रुग्णसंख्या १०,७६३ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४६१अहवाल प्राप्त झाले. यापैकी २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४३३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये शास्त्री नगर येथील पाच, मोठी उमरी येथील चार, डाबकी रोड, अकोट, व्हिएचबी कॉलनी व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित शिवणी, सिंधी कॅम्प, जूने आरटीओ रोड, वाशिम बायपास, हरीहर पेठ, गीता नगर, गोरक्षण रोड, राधाकिसन प्लॉट, जिल्हा परिषद कॉलनी, अदुरा ता. बाळापूर व तापडीया नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
५७१ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,७६३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,८६९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५७१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.