अकोला जिल्ह्यात आणखी २८५ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:16 PM2021-03-16T16:16:43+5:302021-03-16T16:16:53+5:30

Coronavirus News आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २१६ तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये ६९अशा एकूण २८५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.

Another 285 corona positive in Akola district | अकोला जिल्ह्यात आणखी २८५ कोरोना पॉझिटिव्ह

अकोला जिल्ह्यात आणखी २८५ कोरोना पॉझिटिव्ह

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, मंगळवार, १६ मार्च रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २१६ तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये ६९अशा एकूण २८५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २२,१३२ वर पोहोचली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ७३१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २१६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ५१५ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये कारला येथील १८, मोठी उमरी येथील १२, कौलखेड व जीएमसी येथील प्रत्येकी ११, खदान व डाबकी रोड येथील प्रत्येकी आठ, गोरक्षण रोड येथील सात, गोपालखेड येथील सहा, नकाक्षी, मलकापूर, सिंधी कॅम्प, खडकी, व बाळापूर येथील प्रत्येकी पाच, शिवणी, आदर्श कॉलनी व बापू नगर येथील प्रत्येकी चार, दधम, देशमुख फैल, रजपूतपुरा, आळशी प्लॉट, जठारपेठ, राम नगर व पंचशील नगर येथील प्रत्येकी तीन, जीपी क्वॉटर, शास्त्री नगर, तेल्हारा, जूने शहर, अकोट, बजरंग चौक, केशव नगर, वाशिम बायपास, हरिहर पेठ, तारफैल व संतोष नगर येथील प्रत्येकी दोन, म्हैसांग, आखतवाडा, बोरगाव वऱ्हाडे, सोनाळा, हसणापूर, डोंगरगाव, व्हीएचबी कॉलनी, हाता, मोऱ्हळ, एमआयडीसी, कान्हेरी, रणपिसे नगर, पातूर, खिश्चन कॉलनी, पारस, व्याळा, अंबाशी, राहुल नगर, न्यु भीम नगर, गौतम नगर, आनंद नगर, किर्ती नगर, विद्युत कॉलनी, निमवाडी, हिंगणा रोड, रामदासपेठ, राधेनगर, श्रीराम टॉवर रोड, गंगाधर प्लॉट, खगारपुरा, माळीपुरा, तोष्णीवाल लेआऊट, पोळा चौक, दुबेवाडी, खेतान नगर, टॉवर चौक, शिवाजी नगर, जीडी ऑफीस, धामणी, वाडी अदमपुर, न्यु तापडीया नगर, सादीक नगर, रेपाडखेड, पंचगव्हाण, केळीवेळी, पिंपळखुटा, तामसी, अनिकट, काटीपाटी, माधव नगर, पिकेव्ही, बार्शीटाकळी, अशोक नगर, बाबुळगाव, राऊतवाडी, व महाजन प्लॉट येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

५,३७९ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २२,१३२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १६,३४७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४०६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५,३७९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another 285 corona positive in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.