अकोला जिल्ह्यात आणखी २९ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 01:23 PM2020-10-30T13:23:48+5:302020-10-30T13:23:58+5:30
Akola Corona News २९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,३८३ झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला असला, तरी रुग्णवाढीचे सत्र सुरुच आहे. शुक्रवार, ३० आॅक्टोबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्य २९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,३८३ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे १३८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १०९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये अकोला शहरातील सातव चौक येथील चार, मूर्तिजापूर, रजपुतपुरा व राजंदा येथील प्रत्येकी तीन, गणेश नगर, रामदास पेठ, रेणुका नगर व तोष्णीवाल लेआऊट येथील प्रत्येकी दोन, तारफैल, जीएमसी, देवरावबाबा चाळ, जठारपेठ, महाजन प्लॉट, जवाहर नगर, भागवत वाडी जुने शहर, व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
३३४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,३८३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,७७१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २७८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३३४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.