अकोला जिल्ह्यात आणखी २९ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 12:50 PM2021-01-12T12:50:43+5:302021-01-12T12:51:00+5:30
Coronavirus News आणखी २९ पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या १०,९६८ वर पोहोचली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचे सत्र सुरुच असून, मंगळवार, १२ जानेवारी रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी २९ पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या १०,९६८ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४६३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४३४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये कौलखेड, गोरक्षण रोड, भाटोरी ता. मूर्तिजापूर, मूर्तिजापूर,खडकी, मोठी उमरी व जुना हिंगणा येथील प्रत्येकी दोन, तर अकोट, रतनलाल प्लॉट, डाबकी रोड, संताजी नगर, कीर्ती नगर, रामदास पेठ, तापडीया नगर, आदर्श कॉलनी, शिवचैतन्य हॉस्पिटल हिवरखेड रोड, अशोक नगर, जीएमसी बॉय हॉस्टेल, बिसेन लेआऊट, व्हीबीएच कॉलनी, बाभूळगाव ता. पातूर व मित्रा नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
६२६ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,९६८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,०१७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६२६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.