अकोला जिल्ह्यात आणखी २९ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 05:19 PM2021-01-19T17:19:03+5:302021-01-19T17:41:10+5:30

CoronaVirus News शहरातील आणखी एका महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोना बळीची संख्या ३२९ झाली आहे.

Another 29 corona positive in Akola district | अकोला जिल्ह्यात आणखी २९ कोरोना पॉझिटिव्ह

अकोला जिल्ह्यात आणखी २९ कोरोना पॉझिटिव्ह

Next

आणखी एकाचा मृत्यू, ३२ पॉझिटिव्ह, ३२ कोरोनामुक्त

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणार्यांची संख्या वाढतच आहे. मंगळवार, १९ जानेवारी रोजी शहरातील आणखी एका महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोना बळीची संख्या ३२९ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ३२ पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ११,२०४ वर पोहोचली आहे. तर आणखी ३२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३७६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३४४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मुर्तीजापुर येथील चार, गणपती मंदिर, रामनगर व संत नगर प्रत्येकी तीन, अमानखाँ प्लॉट ,अकोट, सिंधी कॅम्प व जठार पेठ येथील प्रत्येकी दोन, तर गोकुळ कॉलनी, सरस्वती नगर, रचना कॉलनी, डाबकी रोड, हिंगणा फाटा, वसंत टॉकीज, आदर्श कॉलनी, बंजारा नगर, राधाकिसन प्लॉट, खडकी व शिवनी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

६५ वर्षीय महिलेचा मृत्यू

कोरोनावर उपचार घेत असलेल्या डाबकी रोड भागातील ६५ वर्षीय महिलेचा मंगळवारी एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना ८ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.

 

३२ जणांना डिस्चार्ज

मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १०, आयकॉन हॉस्पिटल येथून सात, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, तर होम आयसोलेशनचा कालावधी संपलेले ११ अशा एकूण ३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

 

५९९ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,२०४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,२७३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५९९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another 29 corona positive in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.