अकोला जिल्ह्यात आणखी २९६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 04:35 PM2021-03-11T16:35:42+5:302021-03-11T16:35:49+5:30
CoronaVirus News ११ मार्च रोजी आररटीपीसीआर चाचण्यांमध्ये २२७, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ६९ अशा एकूण २९६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गुरुवार, ११ मार्च रोजी आररटीपीसीआर चाचण्यांमध्ये २२७, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ६९ अशा एकूण २९६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २०,१८७ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,६०२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३०५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,३७५ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये जीएमसी येथील २५, मुर्तिजापूर येथील १५, अंबुजा पारस येथील नऊ, डाबकी रोड व हरिहर पेठ येथील प्रत्येकी आठ, जूने शहर येथील सात, मलकापूर, कौलखेड, खडकी व सहकार नगर येथील प्रत्येकी सहा, मोठी उमरी, रजपूतपुरा, बार्शीटाकळी, बाळापूर व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्यकी चार, गजानन नगर, जठारपेठ, अनिकेत, बाळापूर नाका व अखातवाडी येथील प्रत्येकी तीन, खदान, हनुमान वस्ती, खोलेश्वर, पिंपळखुटा, विजय हाऊसिंग, गंगा नगर, तुकाराम चौक, अकोट फैल, शिवनगर, न्यु तापडीया नगर, आळसी, गोरक्षण रोड, रामदासपेठ, सुधीर कॉलनी, निमवाडी, शिवर, भौरद, अकोट व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी दोन, चवरे प्लॉट, दुर्गा चौक, मुभी नगर, जयहिंद चौक, सिंधी कॅम्प, कैलास टेकडी, संतोष नगर, गिरी नगर, अंबिका नगर, ओम हाऊसिंग, माधव नगर, मराठा नगर, ज्ञानेश्वरी नगरी, रुख्मिनी नगर, जयहिंद चौक, पंचशील नगर, बाळापूर रोड, रेणूका नगर, दगडीपूल, मोहता मिल, मूंकूद नगर, सिव्हील लाईन, गौसरवाडी, रणपिसे नगर,अमनपूर, कृषी नगर, गिरी नगर, महमूद नगर, पोलिस हेडक्वॉटर, आनंद नगर, गांधी नगर, बायपास रोड,गीता नगर, गड्डम प्लॉट, लोकमान्य नगर, शंकरविरा, नकाशी, राऊतवाडी, मोहम्मद अली रोड, वानखडे नगर, न्यु भिम नगर, वरोडी, चिखलगाव, सावरा, प्रतिक नगर, ग्रीनलँड कॉटेजजवळ, बिर्ला रोड, तेल्हारा, तापडीयानगर, आरएलटी, लाडीस फैल, अकोट फैल, गुलजारपुरा, चोहट्टा बाजार, खोबरखेड, सातव चौक, घुसर व पळसो बढे येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
५,१३३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २०,१८७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १४,६६३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३९१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५,१३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.