आणखी ३० ‘पॉझिटिव्ह’, ४० कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:20 AM2021-01-03T04:20:06+5:302021-01-03T04:20:06+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी ३७६ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३५१ ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी ३७६ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३५१ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये सिंधी कॅम्प येथील तीन, कमल सोसायटी, डाबकी रोड व आळशी प्लॉट येथील प्रत्येकी दोन, तर वर्धमान नगर, पातूर, गीता नगर, दुर्गा चौक, आश्रय नगर, जठारपेठ, खडकी, कोर्ट क्वॉटर, न्यू तापडिया नगर, मोठी उमरी, आदर्श कॉलनी, गोकुल कॉलनी, कृषी नगर, गोरक्षण रोड, खदान व शांती नगर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
४० जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून चार, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून चार, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, अवघाते हॉस्पिटल येथून एक, स्कायलार्क हॉटेल येथून दोन,ओझोन हॉस्पिटल येथून दोन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले २३ अशा एकूण ४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
४१७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,५३९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,७९९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४१७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.