अकोल्यात आणखी ३१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 03:56 PM2021-01-20T15:56:38+5:302021-01-20T15:56:44+5:30
CoronaVirus News आणखी ३१ पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ११,२३४ वर पोहोचली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचे सत्र सुरुच असून, बुधवार, २० जानेवारी रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ३१ पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ११,२३४ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४१३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३८२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये राम नगर येथील सात, मलकापूर, रणपिसे नगर व केशव नगर येथील प्रत्येकी तीन, डाबकी रोड, गोरक्षण रोड, गणेश नगर येथील प्रत्येकी दोन, तर देवगाव ता. पातूर, उत्तम प्लॉट, बिसेन लेआऊट, रतनलाल प्लॉट, बिरला, न्यू तापडीया नगर, केळीवेळी ता. अकोट, मोहम्मद अली चौक, कौलखेड येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
६३२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,२३४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,२७३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६३२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.