अकोला जिल्ह्यात आणखी ३१७ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:09 PM2021-03-20T16:09:32+5:302021-03-20T16:09:50+5:30

CoronaVirus update Akola ३१७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या २३,०१९ वर पोहोचली आहे.

Another 317 corona positive in Akola district | अकोला जिल्ह्यात आणखी ३१७ कोरोना पॉझिटिव्ह

अकोला जिल्ह्यात आणखी ३१७ कोरोना पॉझिटिव्ह

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी खंडीत होण्याची कोणतीही चिन्हे नसून, शनिवार, २० मार्च रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २४७, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ७० असे एकूण ३१७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या २३,०१९ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १७२५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४७८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मुर्तिजापूर येथील २९, गोरेगाव खु. येथील १६, राजंदा व पारस कॉलनी येथील प्रत्येकी १०, बार्शीटाकळी व खारबडी येथील प्रत्येकी नऊ, बाळापूर व वागरगाव येथील प्रत्येकी आठ, पातूर व सेंट्रल जेल येथील प्रत्येकी सहा, सारखेड ता.पातूर येथील पाच, खडकी, मलकापूर, किनखेड पुर्णा येथील प्रत्येकी चार, मारोती नगर येथील तीन, सुधीर कॉलनी, गोरक्षण रोड, रणपिसे नगर, वृंदावन नगर, कौलखेड, तेल्हारा, गोपालखेड, जठारपेठ, भौरद, पिंजर, वानखडे नगर, शिवणी, मोठी उमरी, निंबी मालोकर, जूने शहर, खदान, सांगवी बाजार, कान्हेरी सरप, हाता, पैलपाडा, डाबकी रोड, व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन, पिंपळखुटा, मुकूंद नगर, न्यु तापडीयानगर, अयोध्या नगर, कोठारी वाटीका, खेडकर नगर, तुकाराम चौक, यशवंत नगर, ग्रामपंचायतजवळ, शिवर, बिर्ला कॉलनी, रवी नगर, गिरी नगर, कोठारी वाटीका, रामदासपेठ, गायगाव, बलोदे लेआऊट, बोरगाव मंजू, टेलीफोन कॉलनी, शेलार फैल, देशमुख फैल, जैन चौक, पंकज नगर, अकशिल नगर, कलेक्टर ऑफिस, लहानउमरी, गोयनका लेआऊट, , हरिहर पेठ, दगडपारवा, महान, आळंदा, भेंडगाव, मोडकवाडी, कानशिवणी, काळा मारोती, फडके नगर, महाकाली नगर, सिव्हील लाईन, वाशिम बायपास, कटयार, अनिकट, श्रद्धा रेसिडेन्सी, रिधोरा, गायत्री नगर,नयागाव, बजरंग चौक, हसनापूर, दाताळा, अमाखाँ प्लॉट, भारती प्लॉट, कैलास टेकडी, सहकार नगर, शिलोड, देशमुख फैल, मनकर्णा प्लॉट, जयहिंद चौक, गोरेगाव बु., चिखलगाव, जीएमसी, कळमेश्वर, समता नगर, जवाहर नगर, हनुमान नगर, आपातापा रोड, उमरी, रजपूतपुरा, उरळ, अकोट, केळकर हॉस्पीटल, अशोक नगर, अवामताळा व निंबा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

५,७७९ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २३,७८३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १७,५८३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४२१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५,७७९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another 317 corona positive in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.