अकोला जिल्ह्यात आणखी ३२१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:34 PM2021-03-10T16:34:13+5:302021-03-10T16:34:24+5:30

CoronVirus News आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २३५, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ८६ अशा एकूण ३२१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली

Another 321 corona positive patients added in Akola district | अकोला जिल्ह्यात आणखी ३२१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

अकोला जिल्ह्यात आणखी ३२१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. बुधवार, १० मार्च रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २३५, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ८६ अशा एकूण ३२१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १९,८२१ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १२४१ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी २३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १००६ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मोठी उमरी येथील २५, सावरा येथील १३, डाबकी रोड येथील १२, रामदास पेठ, मलकापूर, व्हीएचबी कॉलनी येथील प्रत्येकी आठ, जीएमसी, बाळापूर, मुर्तिजापूर, गौरक्षण रोड, शास्त्री नगर येथील प्रत्येकी सात, कौलखेड व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी सहा, लहान उमरी, हरीहर पेठ, रामनगर, अमाखा प्लॉट व खडकी येथील प्रत्येकी पाच, विद्या नगर, किर्ती नगर, शिवणी, खदान, रजपूतपुरा, पळसो बढे व नेवारे नगर येथील प्रत्येकी चार, बालाजी नगर, हिंगणा, रतनलाल प्लॉट, शारदा नगर, खेडकर नगर, आदर्श कॉलनी, जामकी, महसूल कॉलनी व टेलीफोन कॉलनी येथील प्रत्येकी तीन, न्यु राधाकिशन प्लॉट, भिरडवाडी, खोलेश्वर, सांगळूद, हातगाव, शंकर नगर, गीता नगर व गोपालखेड येथील प्रत्येकी दोन, पंचशील नगर, नगरपरिषद कॉलनी, बटवाडी, कोठारी वाटीका, संतोष नगर, महाकाली नगर, खंडाळा, चांदूर, जूनी वस्ती, वरुड, गजानन नगर, सोनोरी, सस्ती वाडेगाव, वनी रंभापूर, पोलिस हेडक्वॉटर, तेल्हारा, बैदपुरा, अकोट फैल येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

 

५,०९० ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १९,८२१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १४,३४२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३८९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५,०९० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another 321 corona positive patients added in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.