अकोल्यात आणखी ३३ रुग्ण वाढले; एकूण रुग्णसंख्या ३०५३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:14 PM2020-08-10T12:14:43+5:302020-08-10T12:14:57+5:30

३३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३०५३ वर पोहचली आहे.

Another 33 patients were admitted in Akola; Total number of patients is 3053 | अकोल्यात आणखी ३३ रुग्ण वाढले; एकूण रुग्णसंख्या ३०५३

अकोल्यात आणखी ३३ रुग्ण वाढले; एकूण रुग्णसंख्या ३०५३

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, या संसर्गजन्य आजाराची नव्याने लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवार, १० आॅगस्ट रोजी जिल्हाभरा आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३०५३ वर पोहचली आहे. दरम्यान, सद्यस्थितीत ५२२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून सोमवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे ३५४ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ३३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३२१ अहवाल निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये सात महिला व २६ पुरुषांचा समावेश आहे. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ३३ रुग्णांमध्ये बार्शीटाकळी तालुक्यातील पुनोती येथील सहा जण, रिधोरा येथील चार जण, अकोट, जठारपेठ, हिवरखेड येथील प्रत्येकी तीन जण, बार्शीटाकळी येथील दोन जण, शिवणी, गौरक्षण रोड, गीता नगर, केळकर हॉस्पीटल, सुधीर कॉलनी, मोठी उमरी, माना, पातूर, सिव्हील लाईन, पिंपरी ता अकोट, दहिगाव गावंडे ता.अकोला व वाल्पी ता.बाशीर्टाकळी येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

५२२ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३०५३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २४१५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५२२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Another 33 patients were admitted in Akola; Total number of patients is 3053

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.