अकोला जिल्ह्यात आणखी ३३८ कोरोना पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:59 PM2021-02-28T16:59:52+5:302021-02-28T17:00:12+5:30
CoronaVirus News Akola आणखी एक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३६७ झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, रविवार, २८ फेब्रुवारी रोजी आणखी एक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३६७ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २६१, तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये ७७ अशा एकूण ३३८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या १६,०१० वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ११६५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २६१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९०४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये कुरणखेड येथील ४४, चिंचखेड ता.मुर्तिजापूर येथील २२, मुर्तिजापूर येथील १५, डाबकी रोड येथील १२, एमआयडीसी व मोठी उमरी येथील प्रत्येकी आठ, गोरक्षण रोड येथील सात, कौलखेड येथील सहा, जठारपेठ, जीएमसी, सिंधी कॅम्प, माना, मलकापूर येथील प्रत्येकी पाच, आदर्श कॉलनी येथील चार, गायत्री नगर, रामदासपेठ, बार्शीटाकळी व केडीया प्लॉट येथील प्रत्येकी तीन, रामगाव, पातूर, शासकीय वसाहत, मार्डी ता.अकोट, केशव नगर,बायपास रोड, तापडीया नगर, गड्डम प्लॉट, पार्वती नगर, कृषी नगर, खडकी, जूने शहर, रवी नगर, म्हैसपूर, शंकर नगर, चैतन्य नगर, राऊतवाडी, जेतवन नगर व गिरी नगर येथील प्रत्येकी दोन, सहकार नगर, येळवन, संत नगर, गीता नगर, तेल्हारा, न्यु भागवत प्लॉट, तेलीपुरा चौक, मालेगाव बाजार, रतनलाल प्लॉट, गजानन पार्क, गांधी रोड, भाटवाडी, विठ्ठल नगर, गुरुदेव नगर, लहान उमरी, शरद नगर, अगासे नगर, व्हिएचबी कॉलनी, अकोट फैल, शिवसेना वसाहत, बाजोरीयानगर, पोलिस क्वॉर्टर, बोरगाव, चांदुर, कान्हायशिवणी, दगडी पूल, पवनपुत्र अर्पाटमेन्ट, हिंगणा नाका, नगर परिषद कॉलनी, जवाहर नगर, भारती प्लॉट, कैलास टेकडी, व्यकटेश नगर, सुधीर कॉलनी, खेतान नगर, खोलेश्वर, विजय नगर, जैन चौक, वानखडे नगर, खानापूर वेस, रुस्तमाबाद, रजपुतपुरा, गोडबोले प्लॉट, सत्यदेव नगर, टॉवर चौक, बाळापूर, राजीव गाधी नगर, उमरी, तोष्णीवाल लेआऊट, दुर्गा चौक, स्वराज्य पेठ, आपातापा रोड, बिर्ला कॉलनी, न्यु तापडीयानगर, रणपिसे नगर, आळसी प्लॉट, मराठा नगर, कलेक्टर ऑफीसजवह, महाजन प्लॉट व मुर्तिजापूर रोड येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.
अकोट येथील महिला दगावली
कोरोनावर उपचार घेत असलेल्या अकोट येथील ६६ वर्षीय महिलेचा रविवारी मृत्यू झाला. त्यांना २३ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
३,५७६ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १६,०१० जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १२,०६७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३६७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ३,५७६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.