आणखी ३४ कोरोना पॉझिटिव्ह, २८ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 07:41 PM2020-11-03T19:41:57+5:302020-11-03T19:42:09+5:30

Akola Coronavirus News ३४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,४७० झाली आहे.

Another 34 corona positive, 28 corona free | आणखी ३४ कोरोना पॉझिटिव्ह, २८ जण कोरोनामुक्त

आणखी ३४ कोरोना पॉझिटिव्ह, २८ जण कोरोनामुक्त

Next

अकोला : जिल्ह्यात मंगळवार ३ नोव्हेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २२, तर रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये १२ असे एकून ३४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,४७० झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे १७९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १५७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये आदर्श कॉलनी व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी चार, लक्ष्मी नगर व ज्योती नगर येथून प्रत्येकी तीन, राऊतवाडी येथील दोन, दहेगाव ता. बाळापूर, जठारपेठ, मराठा नगर, वृदांवन नगर, लहरिया नगर व जीएमसी बॉय हॉस्टेल येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

रॅपिड चाचण्यांमध्ये १२ पॉझिटिव्ह

मंगळवारी झालेल्या एकूण १६७ रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत २१९१८ चाचण्यांमध्ये १५२१ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

२८ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात, कोविड केअर सेंटर मूर्तिजापूर येथून दोन, अवघाते हॉस्पिटल येथून एक, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, सूर्यचंद्र हॉस्पिटल व बिºहाडे हॉस्पिटल येथून प्रत्येकी दोन, हॉटेल रिजेन्सी व हॉटेल स्कायलार्क येथून प्रत्येकी एक तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले नऊ अशा एकूण २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

१९९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,४७० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,९९० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १९९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another 34 corona positive, 28 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.