अकोला जिल्ह्यात कोरोनाचे आणखी ३४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:07 PM2020-11-24T12:07:45+5:302020-11-24T12:09:10+5:30
३४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ९१०९ वर गेली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी आणखी ३४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ९१०९ वर गेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३६५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३२१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये राम नगर व सहकार नगर येथील प्रत्येकी तीन, मलकापूर, तापडीया नगर व कौलखेड येथील प्रत्येकी दोन, सुधीर कॉलनी, पातूर, मोठी उमरी, चोहट्टा बाजार, जवाहर रोड, बहिणाबाई खरोटे कन्या विद्यालय, उमरी, पळसोबढे, जठारपेठ, देवरावबाबा चाळ, अकोट, गजानन महाराज मंदिर खदान, बाळापूर, पारस, रामदासपेठ, गोरक्षण रोड, देशमुख फैल, रणपिसे नगर, चिंचोली ता. बाळापूर, सिंधी कॅम्प, जोगळेकर प्लॉट व सांगवी बाजार येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
५१६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९,१०९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८३०५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५१६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.