मूर्तिजापुर तालुक्यात आणखी ३६ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:17 AM2021-04-26T04:17:05+5:302021-04-26T04:17:05+5:30

------------------------------------ घुसर-म्हैसांग मार्गावर गतिरोधकाची मागणी म्हातोडी: घुसर ते म्हैसांग मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते, परंतु बऱ्याच ठिकाणी गतिरोधक नसल्याने ...

Another 36 positives in Murtijapur taluka | मूर्तिजापुर तालुक्यात आणखी ३६ पॉझिटिव्ह

मूर्तिजापुर तालुक्यात आणखी ३६ पॉझिटिव्ह

Next

------------------------------------

घुसर-म्हैसांग मार्गावर गतिरोधकाची मागणी

म्हातोडी: घुसर ते म्हैसांग मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते, परंतु बऱ्याच ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. संभाव्य धोका टाळण्यासाठी गतिरोधक निर्माण करण्याची मागणी नागरिकांनी केली.

---------------------------------------

मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त

अकोट: मागील काही दिवसांपासून शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना, लहान मुलांना रस्ता पार करताना अडचण जात आहे. कुत्र्यांच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

=---------------------------------------

गावरान आमराई दिसेना; आंबाही दुर्मीळ

मूर्तिजापूर : गावखेड्यात पूर्वीच्या काळात हिरवीगार डहाळीने आकर्षित करत असलेली गावरान आंब्यांच्या आमराया आता दुर्मीळ झाल्या आहेत. संगोपनाऐवजी जुन्या हिरवेगार आम्रवृक्षावर कुऱ्हाडीचे घाव बसत असल्याने गावरान आंबा हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.

----------------------------------

गावे हागणदारीमुक्त कागदावरच!

तेल्हारा: गावे हागणदारीमुक्त करण्याचा शासनाने ध्यास घेतला. याकरिता ग्रामपंचायतीही सरसावल्या. पुरस्कार मिळविले. मात्र, अनेक ग्रामपंचायती कागदावरच हागणदारीमुक्त आहे. खेड्यात शौचालय बांधण्यात आले. मात्र, त्याचा वापर होत नाही.

---------------------------------------------

----------------------------------------------

नियमबाह्य वाहतूक ठरतेय धोक्याची

बाळापूर : नियमबाह्य व विनापरवाना अल्पवयीन वाहन चालक मोठ्या प्रमाणात वाहन चालवित आहे. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. याकडे वाहतूक विभागाने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.

----------------------------------------

Web Title: Another 36 positives in Murtijapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.