शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी ३६.७९ कोटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 11:07 AM2020-02-02T11:07:56+5:302020-02-02T11:08:02+5:30
आणखी ३६ कोटी ७९ लाख ४६ हजार रुपयांचा मदतनिधी शासनामार्फत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी मदत वाटपाच्या तिसºया टप्प्यात आणखी ३६ कोटी ७९ लाख ४६ हजार रुपयांचा मदतनिधी शासनामार्फत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया लवकरच प्रशासनामार्फत सुरू करण्यात येणार आहे.
अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर २५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी १८ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार पीक नुकसान भरपाईची मदत जाहीर करण्यात आली. त्यानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी २९७ कोटी ९४ लाख ३० हजार रुपये मदत निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार शेतकºयांना मदत वाटप करण्याच्या दोन टप्प्यात १३ डिसेंबरपर्यंत शासनामार्फत २३१ कोटी १० लाख ५८ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला. उपलब्ध मदतीची रक्कम जिल्ह्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असून, मदत वाटपाच्या तिसºया टप्प्यात जिल्ह्यातील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ६० कोटी रुपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गत महिन्यात शासनाकडे करण्यात आली होती. त्यापैकी तिसºया टप्प्यात ३६ कोटी ७९ लाख ४६ हजार रुपयांचा मदतनिधी शासनामार्फत १ फेबु्रवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला.
३ फेबु्रवारी रोजी मदतनिधी तहसील कार्यालयांना वितरित करण्यात येणार असून, मदतीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
मदतीचा आकडा २६७.९० कोटींवर!
अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी दोन टप्प्यात २३१ कोटी १० लाख ५८ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यानंतर तिसºया टप्प्यात ३६ कोटी ७९ लाख ४६ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील शेतकºयांच्या मदतीसाठी तीन टप्प्यात प्राप्त झालेल्या मदतनिधीचा आकडा २६७ कोटी ९० लाख ४ हजार रुपयांवर पोहोचला आहे.