अकोला जिल्ह्यात आणखी ३७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:45 AM2021-01-13T04:45:52+5:302021-01-13T04:45:52+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ५३४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ५३४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४९७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये खेतान नगर येथील ४, गीता नगर येथील ३, गोरक्षण रोड, लक्ष्मी नगर, लहरीया नगर, बलोदे लेआऊट व राम नगर येथील प्रत्येकी २, तर उर्वरित बाभूळगाव, काँग्रेस नगर, सांगवी खुर्द, तुकाराम हॉस्पिटल, बार्शीटाकळी, जठारपेठ, गायत्री नगर, शिवाजी नगर, पिंजर ता. बार्शीटाकळी, मचिंद्रा नगर, तोष्णीवाल लेआऊट, अकोट, विठ्ठल नगर, माधव नगर, तापडीया नगर, खडकी, हरिहर पेठ, हिंगणा फाटा, चौरे प्लॉट व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
६२४ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,८६४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,९१७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६२४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.