आणखी ४० पॉझिटिव्ह, ४० कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:17 AM2020-12-29T04:17:49+5:302020-12-29T04:17:49+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी दिवसभरात ५०० चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी दिवसभरात ५०० चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४६० अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये माने एक्स-रे, आरएलटी कॉलेजजवळ येथील सहा जण, कामा प्लॉट टॉवर चौक येथील पाच जण, नवनीत अपार्टमेंट येथील तीन जण, खडकी येथील दोन, आदर्श कॉलनी येथील दोन, केशवनगर येथील दोन, तोष्णीवाल ले-आऊट येथील दोन जण, रजपूतपुरा येथील दोन, सिंधी कॅम्प येथील दोन, मलकापूर येथील दोन, बार्शीटाकळी, गुलजारपुरा, येळवण, ता. अकोला, विठ्ठलनगर, न्यू देशमुख फाईल, चोहोट्टा बाजार, स्वावलंबी नगर, शास्रीनगर, तुकाराम चौक, मोरेश्वर कॉलनी, गीतानगर, जुना राधाकिसन प्लॉट येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
रॅपिड चाचण्यांचा अहवाल निरंक
रविवारी दिवसभरात झालेल्या २४ रॅपिड ॲंटिजेन चाचण्यांमध्ये कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. आतापर्यंत झालेल्या २८,४५७ चाचण्यांमध्ये एकूण १९१५ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
४० जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून नऊ, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, स्कायलार्क येथून चार, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून चार, हॉटेल रिजेन्सी येथून दोन तर होम क्वारंटीन असलेले १५ अशा एकूण ४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
५२६ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,३७६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,५३४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३१६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५२६ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.