दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी ४०.७७ कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 01:31 PM2019-02-15T13:31:18+5:302019-02-15T13:31:31+5:30

दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी दुसºया हप्त्यापोटी आणखी ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२४ रुपयांचा मदतनिधी गुरुवारी उपलब्ध झाला आहे.

Another 40.77 crore to help drought-hit farmers! | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी ४०.७७ कोटी!

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी ४०.७७ कोटी!

Next

अकोला: जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांच्या मदतीसाठी पहिल्या हप्त्यात शासनामार्फत प्राप्त झालेला ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपयांचा मदतनिधी शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी दुसºया हप्त्यापोटी आणखी ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२४ रुपयांचा मदतनिधी गुरुवारी उपलब्ध झाला आहे.
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी ८१ कोटी ५५ लाख ५ हजार ४५६ रुपयांचा मदतनिधी शासनामार्फत मंजूर करण्यात आला आहे. मंजूर करण्यात आलेल्या दुष्काळी मदतनिधीपैकी पहिल्या हप्त्यात ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपयांचा मदतनिधी ३१ जानेवारी रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध मदतनिधी दुष्काळग्रस्त पाचही तालुक्यांच्या तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला असून, मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयांमार्फत सुरू असतानाच, दुष्काळी मदतीच्या दुसºया हप्त्याची रक्कम वाटप करण्यास १३ फेबु्रवारीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांना मदत वाटपाच्या दुसºया हप्त्यापोटी आणखी ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपयांचा मदतनिधी १४ फेबु्रवारी रोजी उपलब्ध झाला. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत १५ फेबु्रवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला मदतनिधी उपलब्ध होणार असून, तहसील कार्यालयांमार्फत मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

९० हजारांवर शेतकºयांच्या खात्यात ४०.७० कोटींची मदत!
जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी पहिल्या हप्त्यात ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपयांची मदत प्राप्त झाली. उपलब्ध मदतनिधीतून १४ फेबु्रवारीपर्यंत पाच तालुक्यांतील ९० हजार ११७ शेतकºयांच्या बँक खात्यात ४० कोटी ७० लाख २३ हजार १८३ रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यात- २३ हजार ७७०, बार्शीटाकळी तालुक्यात- १५ हजार ६८३, तेल्हारा तालुक्यात- १२ हजार १४३, बाळापूर तालुक्यात- १९ हजार २८७ व मूर्तिजापूर तालुक्यात १९ हजार २३४ शेतकºयांच्या याद्या आणि मदतीच्या रकमेचे धनादेश बँकांमध्ये जमा करण्यात आले असून, संबंधित बँकांमार्फत मदतीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे.

 

Web Title: Another 40.77 crore to help drought-hit farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.