आणखी ४०८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:43 PM2021-03-21T16:43:03+5:302021-03-21T16:43:22+5:30

CoronaVius News ४०८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या २४,२७४ वर पोहोचली आहे.

Another 408 corona positive patients were found | आणखी ४०८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

आणखी ४०८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी खंडित होण्याची कोणतीही चिन्हे नसून, रविवार, २० मार्च रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३४८, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ६० असे एकूण ४०८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या २४,२७४ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १४६५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १११७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये बार्शीटाकळी येथील ५३, तेल्हारा येथील ४६, हिवरखेड येथील १८, डाबकी रोड येथील १६, पातूर येथील १४, भंडारज बु. येथील १२, बोरगाव येथील ११, जीएमसी व पारस येथील प्रत्येकी नऊ, खडकी, अडगाव बु., बाळापूर येथील प्रत्येकी सात, बाळापूर नाका व कृषी नगर येथील प्रत्येकी चार, शिवसेना वसाहत, खदान, सोनटक्के प्लॉट, अकोट फैल, चांडक प्लॉट, वाडेगाव, मोठी उमरी दोनवाडा, जवाहर नगर, खोलेश्वर, टिटवा व नाकथाना येथील प्रत्येकी तीन, हरिहर पेठ, जूने शहर, गजानन नगर, रणपिसे नगर, बोरगाव वैराळ, मुर्तिजापूर, मलकापूर, झुरळ बु., उरळ बु., पिंपळखुटा, व्हिएचबी कॉलनी, पोळा चौक, कोळंबी, चांदुर व केळकर हॉस्पीटल येथील प्रत्येकी दोन, शास्त्री नगर, कच्ची खोली, उगवा, जूने आरटीओ रोड, कौलखेड, विवरा, मालसूर, नेरधामणा, जाजू नगर, गीता नगर, इंद्रा कॉलनी, भिम नगर, अंबिका नगर, खरप, फडके नगर, तिवसा, तारफैल, सालासार मंदिर, माधव नगर, आश्रय नगर, गुल्दवाला प्लॉट, हमजा प्लॉट, माळीपुरा, गुडधी, देगाव, मांडवा, तळेगाव बाजार, पाथर्डी, नयागाव, राधेनगर, गणेश सोसायटी, निमवाडी, सिंधी कॅम्प, वनी रंभापूर, लक्ष्मीनगर, हाता, नया अंदुरा, वाशिम बायपास, रिधोरा, राहुलनगर, लहान उमरी, कंवर नगर, तापडीया नगर, अमाखाँ प्लॉट, महागाव, म्हैसपूर, रजपूतपुरा, गोरक्षण रोड, रामदासपेठ, शास्त्री नगर, शिवाजी नगर, साई नगर, अनिकट, लकडगंज, मोहता मिल, चिखलगाव, दाबकी, खेळ मुंगसांजी, तळेगाव पार्तुडा, बलवंत कॉलनी, सातव चौक, जठारपेठ, हिंगणा फाटा, सोमठाना व अमोना ता.अकोट येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

६,१८३ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २४,२७४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १७,६६७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४२४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,१८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another 408 corona positive patients were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.