अकोला जिल्ह्यात आणखी ४५ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ३५२०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 12:23 PM2020-08-24T12:23:04+5:302020-08-24T12:23:13+5:30
सोमवार, २४ आॅगस्ट रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४५ जण पॉझिटिव्ह आढळून आले.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या जीवघेण्या आजाराचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या दिवसेंंदिवस वाढतच आहे. सोमवार, २४ आॅगस्ट रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४५ जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३ हजार ५२० वर गेली आहे.
विदर्भात नागपूर व अमरावतीनंतर सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अकोला जिल्ह्यात आढळून येत आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून सोमवारी आरटीपीसीआर’ चाचणीचे १६६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४५ जण पॉझिटिव्ह असून, १२१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्य २० महिला व २५ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये यामध्ये एकट्या तेल्हारा शहरातील १३ व चांगेफळ येथील १० जणांसह, बाळापूर येथील सात जण, म्हैसपूर येथील चार जण, बोरगाव मंजू येथील दोन जणांचा समावेश आहे. याशिवाय अकोला शहरातील जवाहरनगर, चांदूर, कान्हेरी गवळी, डाबकी रोड, कावसा, देशमुख फैल, गोरेगाव, पोपटखेड व जूने शहर येथील प्रत्येकी एक रुग्णांचाही समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
३७२ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३५२० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३००४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १४४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३७२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.