अकोला जिल्ह्यात आणखी ४५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 01:01 PM2020-11-22T13:01:04+5:302020-11-22T13:01:09+5:30
Akola CoronaVirus News आणखी ४५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९,०१२ झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून,रविवार, २२ नोव्हेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ४५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९,०१२ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १०९४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १०४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मुर्तिजापूर येथील १३, जीएमसी व जूने शहर येथील प्रत्येकी तीन, डाबकी रोड, तापडीया नगर, दहातोंडा ता. मुर्तिजापूर, जठारपेठ व एसबीआय कॉलनी येथील प्रत्येकी दोन, भिम नगर, कुंभारी, मोठी उमरी, वाडेगाव ता. बाळापूर, बाळापूर, कान्हेरी गवळी ता. बाळापूर, दिपक चौक, मयूर कॉलनी, मुकूंद नगर, मिलींद नगर, लहान उमरी, तथागत नगर, मलकापूर, तळेगाव ता. तेल्हारा, जूने केतननगर व दानापूर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
५०७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९,०१२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८२१७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५०७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.