अकोला जिल्ह्यात आणखी ४६ पॉझिटिव्ह, १९ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 06:08 PM2021-02-07T18:08:30+5:302021-02-07T18:08:54+5:30
CoronaVirus News ४६ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ११,८३८ वर पोहोचली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची साखळी खंडित होण्याची कोणतीही चिन्हे नसून, रविवार, ७ फेब्रुवारी रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४६ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ११,८३८ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे २६७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २२१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मोठी उमरी येथील चार, डाबकी रोड, मलकापूर व मूर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, जवाहर नगर, शास्त्री नगर, रणपिसे नगर, डोंगरगाव व बाळापूर येथील प्रत्येकी दोन, तर बाभूळगाव, खडकी, कौलखेड, गणेश नगर, आनंद नगर, खोलेश्वर, दुर्गा चौक, तेली वेटाळ ता. पातूर, जठारपेठ, विवेकानंद कॉलनी, गोरक्षण रोड, कव्हर नगर, गजानन पेठ, तापडीया नगर, न्यू भागवत प्लॉट, खेडकर नगर, घोडेगाव ता. तेल्हारा, उगवा, आदर्श कॉलनी, चांदुर, अकोट फाईल, बार्शीटाकळी व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
१९ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून दोन, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, बिहाडे हॉस्पीटल येथून आठ, हॉटेल रिजेंसी येथून चार, हॉटेल स्कायलार्क येथून दोन तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेला एक अशा एकूण १९ जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.
८०८ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,८३८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १०,६९२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३३८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ८०८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.