अकोला जिल्ह्यात आणखी ४६३ पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 08:44 PM2021-03-01T20:44:44+5:302021-03-01T20:45:13+5:30
आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३९८ , तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये ६५ अशा एकूण ४६३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून सोमवार, १ मार्च रोजी आणखी तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३७० एवढी झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३९८ , तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये ६५ अशा एकूण ४६३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या १६,६०८ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २०७२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३९८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १६७४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तेल्हारा येथील २४, मुर्तिजापूर येथील २३, एमआयडीसी येथील १८, अकोट येथील १०, खडकी येथील नऊ, बाळापूर येथील आठ, शेलू बोंडे येथील सात, सुकळी, देवळी व राम नगर येथील प्रत्येकी पाच, जठारपेठ, जीएमसी, रामदासपेठ व तुरखेड येथील प्रत्येकी चार, अडगाव, गोरक्षण रोड, आदर्श कॉलनी व नया अंदुरा येथील प्रत्येकी तीन, डाबकी रोड, लक्ष्मी नगर, रणपिसे नगर, खदान, कौलखेड, आकाशवाणी, मलकापूर, मोठी उमरी,वरुर, वाशिंबा, जीएमसी हॉस्टेल, हरिहर पेठ, संत नगर, दत्त कॉलनी, अंभोरा येथील प्रत्येकी दोन, रोहणखेड ता.अकोट, चितलवाडी, हिंगणा रोड, उमरी, किर्ती नगर, पीकेव्ही कॉलनी, गोरेगाव, रजपुतपूरा, वडद बु., एकलरा, लोहारा, देवगाव, विताली, कापरवाडी बु., अन्वी, वनीरंभापूर, मनारखेड, हिवरखेड, तेल्हारा, अकोट फैल, राऊतवाडी, शिव नगर, गड्डम प्लॉट, संतोषी माता मंदिर, अकोलखेड, तापडीया नगर, वृदावन नगर, मांजरी ता.बाळापूर, परदा ता.अकोट, न्यु तापडीया नगर, रतनलाल प्लॉट, बार्शिटाकळी, खोलेश्वर, हिंगणा फाटा, न्यु राधाकिसन प्लॉट, घोटा ता.बार्शिटाकळी, पुनोती ता.बार्शिटाकळी, राहित ता.बार्शिटाकळी, जामठी खु. व दहातोंडा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी पातुर येथील २३, कौलखेड येथील १५, जीएमसी येथील १३, सिंधी कॅम्प येथील १२, अकोट येथील १०, चानी ता. पातूर येथील नऊ, डाबकी रोड येथील आठ, जूने शहर येथील सहा, जठारपेठ व मोठी उमरी येथील प्रत्येकी पाच, गजानन नगर, रामदासपेठ, राठी पेठेवाला, खडकी, मलकापूर व कळमेश्वर ता.बार्शीटाकळी येथील प्रत्येकी तीन, कलेक्टर कॉलनी, उमरी, तापडीया नगर, पागरा ता.पातूर, अंभोरा, रणपिसे नगर, किर्ती नगर, बाळापूर रोड, बोरगाव मंजू, आदर्श कॉलनी व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी दोन, हनुमान नगर, दोनवाडा, चतुर्भूज कॉलनी, खदान, लहान उमरी, कापसी, टॉवर चौक, हिंगणा फाटा, अकोली, श्रावगी प्लॉट, पत्रकार कॉलनी, गांधी ग्राम, तारफैल, पंचशील नगर, रतनलाल प्लॉट, बापु नगर, माता नगर, अशोक नगर, न्यु गोडबोले प्लॉट, कान्हेरी गवळी, हिंगणा रोड, चौरे प्लॉट, हमजा प्लॉट, शास्त्री नगर, सातव चौक, महसूल कॉलनी, जूने खेतान नगर, केशव नगर, पिंजर, जेल क्वॉटर, जवाहर नगर, राधाकिसन प्लॉट, मुकूंद नगर, माधव नगर, नयागाव, खोलेश्वर, रजपूतपुरा, कोठीरी वाटीका, श्रध्दा नगर व बडेगाव येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
तिघांचा मृ्त्यू
कोरोनावर उपचार घेत असलेल्या शिलोडा येथील ४० वर्षीय महिला, जूने शहर येथील ६१ वर्षीय पुरुष व बारा ज्योतिर्लींग मंदिर जवळ, अकोला येथील ८८ वर्षीय रुग्ण अशा तीघांचा सोमवारी मृत्यू झाला. या तिघांनाही अनुक्रमे २८, १५ व १८ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
२७२ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४३, स्कायलार्क येथील सहा, आयुर्वेदि महाविद्यालयातून १७, बिहाडे हॉस्पीटल येथील आठ, ओझोन हॉस्पीटल येथील सहा, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील चार, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, तर होम आयसोलेशन येथील १८० अशा एकूण २७२ जणांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला.
३,६६४ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १६,६०८ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी तब्बल १२,५७४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ३७० जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ३,६६४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.