आणखी ४७ पॉझिटिव्ह, ३६ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:19 AM2021-01-25T04:19:13+5:302021-01-25T04:19:13+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २२०८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २२०८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २१६४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट, वानखडे नगर, मुंडगाव ता. अकोट व दीपक चौक येथील प्रत्येकी दोन, श्री समर्थ प्रा. स्कूल, रेणुकानगर, जि.प. तांदळी, जि.प. नागोली, जि.प. शाळा माना, जि.प. शाहा वाईमाना, जि.प. शाळा अकोली जहांगीर, कंझरा ता. मूर्तिजापूर, सिरसो ता. मूर्तिजापूर, कोळंबी ता. मूर्तिजापूर, तारफाईल, गोरेगाव, दाळंबी, सांगळुद, रामापूर ता. अकोट, पार्वती नगर, कौलखेड, सुधीर कॉलनी, सिंधी कॅम्प, द्वारका नगरी, राम नगर व तुकाराम चौक येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी अकोट येथील तीन, जि.प. शाळा सातारगाव, सावरा, राधाबाई बकाल विद्यालय लोहारा, उरळ बु., यशवंत लेआऊट, आदर्श कॉलनी, आंबोडा ता. अकोट, केशवराज वेटाळ ता.अकोट व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
३६ जणांना डिस्चार्ज
शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १२, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून एक, स्कायलार्क हॉटेल येथून दोन, तर ओझोन हॉस्पिटल येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले १८ अशा एकूण ३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६२६ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,३४१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,३८४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३३१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६२६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.